5 japanese technique cha upyog करा आणि आळसाला कायमचा राम राम ( best technique to defeat laziness )

5 japanese technique cha upyog करून आळसाला कायमचा राम राम करता येऊ शकतो मित्रांनो ,त्या साठी आलास न करता तुम्हाला हा लेख पूर्ण पणे वाचावा लागेल .

मित्रांनो कोणताही मनुष्य जन्मताच आळशी असतो असं नाही ,आलास येण्याला बरीच करणे असतात त्यातील काही ठराविक करणे म्हणजे इच्छा शक्ती ची कमी असणे , किंवा कुठलिही गोष्ट करण्यासाठी उत्साह नसणे. काहींना तर आजारपणामुळे देखील आळस येऊ शकतो .

5 japanese technique cha upyog

आयुष्यामध्ये प्रत्येक जण मोठं मोठी स्वप्न बघत असतो . प्रत्येकजण काही तर करून दाखवीन अश्या गोष्टी तो मनामध्येच ठरवत असतो , पण शेवटी त्याचा आळस च त्याच्या स्वप्नांचा घात करत असतो , त्याचा कामाच्यावेळी केलेला आलास त्याची चालढकल करण्याची वृत्ती त्याच्या सर्व स्वप्नावर पाणी फिरवत असते . शेवटी त्याच्या सर्व निराशाच कारण त्याचा आलास बनत असतो .

याच साठी आज आपण अश्या 5 japanese technique cha upyog वापर करून आळस कायमचा कसा घालवायचा ते पाहणार आहोत .या साठी अगोदर आपल्याला जपानमधील लोकांविषयी थोडी माहिती असणे आवश्यक आहे .

जपान मधील शिस्तीचे जगभरात उदाहरणे दिली जातात , याचे कारण म्हणजे तेथील लोकांचा वक्तशीरपणा , नेहमी कामाविषयी असणारी पॉसिटीव्ह दृष्टी , कामाविषयी त्यांचे समर्पण.  अशी शिस्त आणि  जपान सारखे असे समर्पण जगभरामध्ये इतर कुठल्याही देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळणे अवघड आहे .

हि शिस्त आणि असे समर्पण त्यांना अनुवांशिक असल्या सारखेच वाटतात पण तसे नसून तेथे या शिस्तीचे धडे हे बाळ मनावरचं गिरवले जातात , अगदी लहान वयात स्वच्छता , स्वावलंबन , चिकाटी , काटकसर , आरोग्य इत्यादी विषयी त्यांना शिकवले जाते .

तेथील पूर्वजांचा देखील या शिस्तीमध्ये आणि अश्या जीवनपद्धती मध्ये मोठा वाटा आहे . म्हणतात ना जसे वळण असेल तसे पाणी जात असते , त्यांच्या पूर्वजांनी ज्या चाली रीती आणि काम करण्याच्या किंवा विचार करण्याच्या पद्धती चा स्वीकार केला त्याचे हे फळ म्हणूण जगभरामध्ये जपान चे गोडवे गायले जात असतात .

 Ambani Family कडून शिका ह्या 7 गोष्टी…
               येथे वाचा 

दोन वेळा अणुअस्त्र हल्ला आणि रोजचाच असलेले भूकंप अश्या महाभयाणक परस्थितीतून जपान ने आज एवढे उंच शिखर गाठले  आहे कि काही देश तिथपर्यंत पोहचण्याचा विचार देखील करणार नाहीत . आपल्या नेहमी काम करण्याच्या शिस्ती मुळे आज जपान वर अनेक अस्मानी संकट येऊन देखील जनाब हा महासत्ता म्हणून ओळखला जातो . शिस्त आणि नियोजन या दोन गोष्टीवर काम करून कोणत्याही मोठयातल्या मोठ्या संकटावर मात करता येऊ शकते आणि जग जिंकता येऊ शकते हि शिकवण आज जपानच्या लोकांनी सर्व जगासमोर मांडली आहे .

आता पाहुयात त्या 5 japanese technique cha upyog ज्या आपले जीवन बदलू शकतील .

या5 japanese technique cha upyog ह्या त्यांच्या संस्कृती मध्ये पूर्वापार पासून चालत आलेल्या आहेत , याच काही पद्धतीमुळे आज जपान मधील जनता कोणत्याही अस्मानी संकटाला न घाबरता आणि न डगमगता असेल त्या विषम परस्तितीमध्ये सतत कार्यरत असते .

१. seiri , seiton , seoso या three S technique  ::

एक चांगला परिसर आणि चांगली संगत तुम्हाला चांगल्या वागणुकीस प्रेरणा देत असत ,आणि तुमच्या कडून आपोआप चांगली काम होत राहतात पण तेच जर तुम्ही विषम वातावनात असाल तर तुम्ही देखील तसाच नेगेटिव्ह विचार करायला लागतात तुमचा कल वाईट गोष्टींकडे आपोआप जाऊ लागतो व ती वाईट सवय तुमच्या अंगवळणी पडल्यानंतर ती जाता जात नाही .

जपानी लोक आपल्या सभोवताली कोणत्या गोष्टी आहे यांच्याकडे खूप जास्त लक्ष देऊन असतात .त्यासाठी ते लोक या थ्री S technique मधील पहिल्या S चा म्हणजेच seiri चा उपयोग करत असतात .

seiri ::  म्हणजे गोष्टींचे वर्गीकरण करणे उपयोगी आणि निरुपयोगी असे दोन भाग करून आपल्या सभोवताली फक्त अश्याच वस्तू ठेवायच्या ज्या आपल्यासाठी उपयोगी असणार आहेत .

तसेच कुठलीही अनावश्यक वस्तू किंवा गोस्ट सोबत ठेवायची नाही .असे केल्याने आपला समोर असणाऱ्या कामावरील फोकस वाढतो आणि विषयांतर होत नाही .

seiton :: म्हणजे set in order व्यवस्तीत क्रम लावणे , वरील प्रमाणे वस्तूंचे वर्गीकरण झाल्यानंतर तू वस्तू उपयोगानुसार व व्यवस्थित  क्रमाने ठेवणे यालाच seiton technique असे म्हणतात .

असे केल्याने कामाच्या वेळेमध्ये आपल्याला गोष्टी सापडण्यात अडचण होत नाही तसेच काम सुलभ होऊन जाते .

seoso :: म्हणजे चमकवने वरील दिलेल्या पद्धतीनुसार सामान व्यवस्तीत ठेवल्यानंतर त्या जागची व्यवस्थित स्वच्छता करून घावी .कुठे हि थोडी पण या अस्वछता दिसली नाही पाहिजे . स्वछ आणि सुंदर जागेत काम करताना आळस येण्याचे चान्सेस खूपच कमी होऊन जातात आहे कामामध्ये मन लागले जाते .

वरील  दिलेल्या तीन पद्धतीचा वापर करून तुम्ही कोणतेही काम अगदी आळस न करता करू शकता . तुम्हाला जर या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर वर दिल्या प्रमाणे एक दिवस करून पहा.

वर दिल्या प्रमाणे दिवसभर सर्व गोष्टींचे पालन करायचे आणि आपल्याला जाणवलेला बदल स्वतः अनुभवायचा . एखादी जादू होत असल्या प्रमाणे तुम्हाला स्वतःमधील आणि मानसिकतेमधील बदल  जाणवेल . हळू हळू या सवयी अंगीकारून तुम्ही एक शिस्त बद्द काम करण्याची पद्धत डेव्हलोप कराल .

5 japanese techniques
5 japanese technique cha upyog

 

२. kaizen method :: (5 japanese techniques)

काईझेन मेथड मध्ये कामाची विभागणी केली जात . कोणतेही मोठे काम छोट्या छोट्या कामामध्ये विभागून ते काम हळू हळू एक एक करून करणे यालाच सोप्या भाषेत काईझेन मेथोड असे म्हणतात .

Kaizen हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे एक म्हणजे kai म्हणजे बदल आणि दुसरा zen म्हणजे शहाणपण. हे दोन शब्द एकत्र येऊन तुम्हाला एक गोष्ट शिकवतात ती म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्य एका झटक्यामध्ये बदलू शकत नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल करावे लागतील व ते बदल निरंतर चालू ठेवावे लागतील .

तरच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून येतील. यामध्ये तुम्हाला वेळेचा आणि तुमच्या हुशारीचा उपयोग करायचा आहे कुठलेही घाई गडबड करायची नाही सर्व गोष्टी विचारपूर्वक व पुरेसा वेळ देऊनच करायच्या आहेत. या kaizen मेथड चा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला जड वाटणारे एखादे काम हाती घ्या.

व ते रोज थोडे थोडे पार पाडा व काही दिवसातच ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्यामध्ये एक प्रकारचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास वाढीस लागेल याचा उपयोग तुम्हाला त्यापेक्षा मोठ्या काम करण्यामध्ये उपयोगी येईल ही पद्धत अशीच कार्यकर्ते.

थोडे थोडे आणि निरंतर अशा प्रयत्नांमधून कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते हेच या पद्धतीमध्ये दडलेले आहेत. उदाहरण दाखल जर तुम्हाला एक चांगली शरीरयष्टी तयार करायची असेल पण ठरवून देखील तुम्ही व्यायाम करत नसाल तर या कार्यामध्ये तुम्हाला काय जण मेथड वापरता येईल.

यामध्ये तुम्ही रोज फक्त दहा मिनिटे देऊन व्यायामाला सुरुवात करा निरंतर केलेल्या या पद्धतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व तुम्हाला व्यायामाचा वेळ वाढवण्याचे प्रोत्साहन मिळेल हळूहळू तुमची शरीरयष्टी तुम्हाला हवी तशी तयार करता येईल.

 

 

कामाचा ताण आहे म्हणून काम करायचेच सोडून दिले असे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात . एखादे ओझे जास्त झाले म्हणून ते आपण तेथेच टाकून देखील जातो .एखादी गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर असली तर आपण लगेच हात वर करायला मोकळे असतो .

पण जपानच्या संस्कृती मध्ये काम अर्धवट सोडणे किंवा ते मध्येच टाकून जाणे या पद्धतीचा निषेध केला जातो ,तेथे काम पूर्णच करावे लागते , हेच अवघड वाटणारे काम पूर्ण करण्यासाठी काईझेन मेथोड च्या उपयोग जपान मध्ये केला जातो .

4.kaikaku :: ( 5 japanese techniques )

ही एक जपानी संकल्पना म्हणून ओळखली जाते . या 5 japanese techniques पद्धतीमध्ये kaizen पद्धतीच्या उलट काम केले जाते काय काकू या पद्धतीमध्ये पूर्णपणे बदल केला जातो kaizen पद्धतीमध्ये आपण मोठा बदल करण्याचे टाळतो व छोटे पाऊल उचलून काम करण्यास तयार होतो पण या उलट या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्णपणे बदल करायचा आहे.

काही कामांमध्ये kaizen पद्धत ही योग्य ठरते तर काही कामांमध्ये आपल्याला kai kaku याच पद्धतीचा उपयोग करून काम फक्त पाडावे लागते. जसे की जर तुम्हाला शरीरयष्टी बनवायची असेल तर तुम्हाला काय झेन हीच पद्धत वापरावी लागेल व तीच योग्य ठरेल.

चार-आठ दिवसांमध्ये दिवसभर सतत व्यायाम करून तुम्हाला लगेच बॉडी बनवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला निरंतर व थोडे थोडे प्रयत्न करावे लागणार नाहीत.

या उलट एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल तर आठ दिवस लागणाऱ्या प्रोजेक्ट साठी तुम्ही पूर्ण फोकस करून तोच प प्रोजेक्ट पाच दिवसात देखील पूर्ण करू शकता अशा कार्यांमध्ये तुम्ही kaikaku या पद्धतीचा पुरेपूर वापर करू शकता.

5.hara hachi bu :: 5 japanese techniques  याचा अर्थ असा आहे की,

आपल्या दैनंदिन आहाराविषयी नेहमी सजग असणे. आपण नेहमी आपल्याला लागणाऱ्या आहारा पैकी 80 टक्के आहार घेणे योग्य आहे म्हणजेच आपल्याला कुठलीच गोष्ट पोटभर खायची नाही आपल्या पोटामध्ये नेहमी 20% जागा ही शिल्लक ठेवायची आहे .

असे केल्याने पचनाचे कुठलेही आजार उद्भवत नाहीत. आळस येण्याचं किंवा कामाच्या वेळेस आळस करण्याचे मुख्य कारण आपले भरलेले पोट देखील असू शकते . hara hachi bu (5 japanese technique cha upyog ) या पद्धतीमध्ये आपण किती आहार घ्यायला पाहिजे कोणता आहार आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.

आपण काय खाल्ले पाहिजे किंवा काय नाही याचा विचार या हाराहाची बु या पद्धतीमध्ये केला जातो. या पद्धतीचे जीवन जगणारे एक उत्तम उदाहरण म्हणजे जपान मधील ओकिनावा शहर हे शहर देशातील ब्लू झोन मध्ये आहे व येथील नागरिक हे शंभर टक्के निरोगी आहेत. येथील लोकांचे वय 100 च्या पुढे जाते व अशा वयामध्ये देखील ते एकदम तंदुरुस्त वाटतात.  आपल्या शेवटच्या घटकेपर्यंत काम करत असतात व शेवटपर्यंत स्वावलंबी जीवन 5 japanese technique cha upyog च्या साहाय्याने जगतात.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment