महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
जाहिरातीचे पदे वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1(पारेषण प्रणाली), तंत्रज्ञान 2 (पारेषण प्रणाली)
सेवा योजना जाहिरात क्रमांक दहा ऑब्लिक 20 24 अंतर्गत निघालेली अधिसूचना
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कर्मचाऱ्यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारित कर्मचारी मानांक याविषयीचा कार्यालयीन आदेश काढत दिनांक 15 6 2019 द्वारे प्रसारित केला आहे.
या अधिसूचनेच्या अंतर्गत कंपनीतील वेतनगड तीन मधील मंडळ स्तरीय सेवा जेष्ठता यातील वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ एक पारशीन प्रणाली व तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली ची अधिसूचनेच्या कोट्यातील रिक्त पदे एकत्रित करून अनुक्रमे भरण्यात येणार आहेत.
महापारेषण अंतर्गत अनुभवी व शैक्षणिक अहर्ता धारण करणारे कर्मचारी यांना या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत महा ट्रान्स को या कंपनी अंतर्गत एकूण सात परिमंडले आहेत ते खालील प्रमाणे.
अमरावती ,छत्रपती संभाजीनगर, कराड, पुणे ,नाशिक ,वाशी , आणि नागपूर
उमेदवाराच्या पात्रता अटी जसे वय त्यांची शैक्षणिक अर्हता व त्यांचा अनुभव हा दिनांक 31 7 2024 या दिवशी तपासला जाईल.
रिक्त पदाच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरातीसोबतचे पत्र क्रमांक एक हे पहावे त्यामध्ये मंडल निहाय जागांचे विवरण दिलेले आहे ते पाहूनच उमेदवाराने आपला अर्ज सादर करावा.
वेतनश्रेणी
वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली
या पदावर निवड झाल्यास उमेदवारास रुपये 30810-1060-36110-1160-47710-1265-88190 या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळेल
तंत्रज्ञ एक पारशीन प्रणाली
या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रुपये 29 935-955-34 710-10 60-45 310-11 60-82 430 या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळेल
तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली
या पदावर उमेदवाराची निवड झाल्यास त्यांना रुपये 29 035(710),32585(955)42135(1060),72875.
याचबरोबर उमेदवारांना मूळ वेतन सोडून इतर महागाई भत्ते वैद्यकीय भत्ता घरबाडे भत्ता वगैरे अन्य सर्व भत्ते कंपनीच्या नियमानुसार लागू असतील.
याचबरोबर उमेदवारांना मूळ वेतन सोडून इतर महागाई भत्ते वैद्यकीय भत्ता घरबाडे भत्ता वगैरे अन्य सर्व भत्ते महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नियमानुसार लागू असतील.
शैक्षणिक अर्हता
शिकवू उमेदवारी कायदा 1961 नुसार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले तारतंत्री वीजतंत्री या विषयातील व्यावसायिक प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक
किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री किंवा तारांतरी व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
व त्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र असावे.
अनुभव
1. वरिष्ठ तंत्रज्ञ
–
वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली यांसाठी सहाय्यक तंत्रज्ञ सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण सहा वर्षाचा अनुभव असणे किंवा एकूण चार वर्ष अनुभवांपैकी दोन वर्षेही आरक्षण प्रणाली या पदाचा दोन वर्षाचा अनुभव असावा
2. तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली
यासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा किमान चार वर्षाचा अनुभव असावा किंवा तंत्रज्ञ दोन आरक्षण प्रणाली या पदाचा एकूण दोन वर्षाचा अनुभव असावा.
3. तंत्रज्ञ दोन
या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण दोन वर्षाचा अनुभव असावा .
वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही 57 वर्षे राहील. 57 वर्षांच्या आतील उमेदवार या पदासाठी आपला अर्ज दाखल करू शकतात
निवड पद्धती
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना या परीक्षेत बोलवण्यात येईल.
परीक्षेला बोलावले म्हणजे तो उमेदवार त्या पदासाठी पात्र असेलच असे नाही कारण परीक्षेला बोलावण्याआधी उमेदवाराची कुठलेही पूर्व पडताळणी केलेली नसेल.
ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवार बोलवण्यापूर्वी त्यांची पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही.
उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रते संबंधीच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतरच पूर्ण होईल याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
ज्या उमेदवारांचा अर्ज प्राप्त झालेला असेल अशा सर्व उमेदवारांची ऑब्जेक्टिव्ह अशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
ही ऑनलाईन परीक्षा पदासाठी आवश्यक असणाऱ्या कॉलिफिकेशन व जनरल एट्टीट्यूड यावर आधारित असणार आहे.
अनु क्र | विषय / उपविषय | प्रश्न | गुण | परीक्षा कालावधी |
१. | वीजतंत्री विषयाचे ज्ञान | ५० | ११० | एकत्रित १२० मिनिटे |
२. | सामान्य अभियोग्यता | —— | ||
अ } र्तकशक्ती | ४० | २० | ||
ब } संख्यातमानक अभियोग्यता | २० | १० | —– |
क } मराठी भाषा | २० | १० | ||
ऐकून | ८० | ४० | ||
ऐकून १ आणि २ |
उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तराला दंड म्हणून 0.25 एवढे मार्क त्यांच्या मिळालेल्या गुणांमधून प्रत्येक चुकीच्या पर्यायाबद्दल कपात केले जाते.
दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे एकूण गुण जर एक समान येत असतील तर अशा उमेदवारांची जन्मतारीख लक्षात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वयानुसार प्राधान्य दिले जाईल व ते उमेदवार पात्र ठरवण्यात येते.
या प्रकारच्या वेगवेगळ्या भरतीच्या update मिळवायच्या असतील तर आपल्या website ला रेगुलर भेट देत जा .व नुकत्याच जाहीर झालेल्या IBPS च्या भरतीची माहिती जाणून घ्या लाल लिंक वर क्लिक करून .
परीक्षा केंद्र
ऑनलाइन परीक्षेसाठी खालील दिलेल्या परीक्षा केंद्र असतील(महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण)
अमरावती, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, नागपूर.
उमेदवारांना तीन परीक्षा केंद्र निवडण्याचा अधिकार असेल त्यापैकी त्यांना एक परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल.
या व्यतिरिक्त भरती विषयी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण यांच्या official लिंक वर जाऊन जाणून घ्या .