Navnath bhaktisar adhyay 6 श्री नवनाथ कथा सारांश अध्याय सहावा या अध्यायामध्ये आपण मच्छिन्द्रनाथ महाराज व कालिका माता यांच्या मध्ये झालेल्या युद्धाचे वर्णन आले आहे ते कथा रूपाने पाहू …
मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिकेच्या स्थान पाहून कोकण प्रांतामध्ये शिरले . आणि कुडाळ जवळील आडूल या गावाजवळ जाऊन राहिले.
गावा बाहेर दुर्गा देवीचे मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत असे ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कालिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी शंकराने त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला होता . त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्रशक्तीस म्हणाले तू पुष्कळ कार्य केले आहेस तुला हवा तो वर मागून घे तेव्हा ती अस्त्र शक्ती म्हणाली, हे शंकरा माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जिथे तुम्ही पाठविले तिथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केले आहे .अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे आता मी थकले आहे मला आता विश्रांती घ्यायची आहे कोणी मला सुप्त अवस्थेतून उठून त्रास देऊ नये.
(Navnath bhaktisar adhyay 6 कथा )
तिच्या विनंती प्रमाणे शंकराने कालिकादेवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले. पुढे कलियुगात ते स्थान कालिकादेवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली हे कालिके तू जागृत हो मी शाबरी विद्येचे मंत्र काव्य केले आहे त्याला तू सहाय्य कर त्याची प्रार्थना म्हणजे सिद्धांनी केलेले आवाहन होते.
त्याचा प्रभाव काय वर्णन त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली त्यामुळे ती रागावली. नृसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्र याला ओरडून म्हणाली, ”अरे मुर्खा मी चांगली झोपलेली होती मला तू का उठवलीस म्हणे मंत्र काव्य केले आहे वर दे .”
कुणी सांगितले होते तुला काव्य करायला माझे सगळे कार्य झाले आहेत आता आपल्यासाठी मला नवीन करमत घेऊ नकोस जामुकाट्याने हे तुझे राग फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा असा उल्लेख Navnath bhaktisar adhyay 6 मध्ये आहे .
नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसाच जाळून जाशील .
Navnath bhaktisar adhyay 6 नुसार
ते बोलणे एकूण मच्छिंद्र धरी आणि म्हणाला देवी तसे काही होणार नाही सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते तू माझा प्रताप पहा मारुतीला पांडवांनी जसा प्रेमाने रथावर घेतले सूर्य आणि अरुणाला जसे सारखी केले तसे तुझे सही मला पाहिजे.
Navnath bhaktisar adhyay 6 नुसार देवी म्हणाली अरे जारे हातात कंकणी घातलीस व कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही तू कसा जन्मालास ते मला ठाऊक आहे मत्स्यजातक सांगणार यनी फार तर मासे पकडावे
तू कोळ्याच्या घरून पडून आला स तू मला काय शिकवतोस आणि एवढी विद्या आहे म्हणतोस मग तू भिका मागतोस तुला वाटत असेल भुतामुळे जिंकली आता काली केलं नमो पण ते होणे नाही तुझा अहंकार उतरंडी पाडी तिथे तुझा काय पाड?
मच्छिंद्र म्हणाला दाखव तुझा पराक्रम परीक्षा घेतो तुझी दत्तगुरुचा चेला आहे , झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय मान सुद्धा हलत नाही तुझे शौर्य तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. तू इतकी बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली ती ब्रह्मड प्रकाशित करीत प्रकट झाली प्रयोग यातील चराचरांचा थर काप उडाला. देव दानव यक्ष गंधर्व दिग्गज दिपाल सर्प नाग पशुपक्षी मानव ऋषी सर्वच भयभीत झाले देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या आता स्वतःला सांभाळ गुरुचे स्मरण कर अरे शक्ती माहीत नसताना काली केला युद्धास निमंत्रण केलेस आता तुझ्यामुळे सर्वांनाच होणार कसे रक्षण करतोस पाहू.
देवी ओरडून म्हणाली अरे जोगड्या पृथ्वी ही खालची तळी व मीही वरचि तळी आता या जगात सर्वांसकट तुला भरडून काढते त्यातून कसा काय वाचतोस तेच पाहते.
मच्छिंद्र न घाबरता भस्म चिमूट घेऊन वासवस्त्र मंत्र म्हणू लागला तेच भस्म त्याने प्रलयअग्नी सारख्या देवीवर फेकले. एकदम स्फट होऊन सहस्त्र सूर्य प्रकट व्हावे एवढा प्रकाश पडला त्यावेळी ब्रह्मांडस्फट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले पण कालिकेने ते अस्त्र गिळून टाकले तेव्हा एकादशी रुद्राचे मंत्र म्हणून मच्छिंद्र आणि अकरा रुद्र प्रकट केले पण कालिकेने मृत्युंजय मंत्राच्या सुक्तांनी पूजा करून सर्व रुद्रंना शांत केले.
ते परत मच्छिंद्रनाथांकडे आले आणि गुप्त झाले मग त्यांनी वज्र अस्त्र उंच फेकले . पण कालिकेने ते आपल्या पायांनी खाली धडकवले व उत्तरेकडील सह्याद्रीवर आपटले त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गुजर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही तेच पासून आरामेश्वर पर्यंतच पर्वतांची ओळ राहिली. देवीने वज्रस्र नष्ट केली हे पाहून मात्र मच्छिंद्र आणि गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजने त्याचा मंत्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला व तिचे शरीर अचैतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्याखाली पर्वत चिरडले वृक्षांचा सोडा झाला ती अशी पडता पडताच तिला कैलाशनाथांचे स्मरण झाले. धावा धावा उमानाथ धावा , अशी तिने म्हणून प्रार्थना केली ती सूक्ष्म वाणी कैलास पती शंकराच्या मनात उमटली व आपली शक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तत्काळ समजले.
ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले जिथे मच्छिंद्र होता तेथे ते येताच मच्छिंद्र आणि भक्ती पमाणे शिवचरणी लोटांगण घातले.
नवनाथ भक्तिसार च्या सर्व अध्यायांची फलश्रुती जाणून घ्या . त्यावर क्लिक करून
.Navnath bhaktisar adhyay 6 पुढे असा उल्लेख आहे की , नंदीवरून उतरून शंकरांनी मच्छिंद्र ला पोटाशी धरले आणि त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हटले तांहुल्या आज तू मोठा चमत्कार केलास खूप मोठा पराक्रम केलास माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतले. असे म्हणून शिव शंकरांनी त्याला आलिंगन दिले मच्छिंद्रनाथ म्हणाला आदिनाथ हे तुमची कृपा बद्रिका वनात दत्त करून कडून तुम्हीच माझे सहा महिनेपर्त रक्षण करून सर्व विद्या दिली होती.
. शंकर म्हणाले ते असो तो आता खाली केला सावरकर मच्छिंद्रनाथ म्हणाले तुम्ही आपला वर जास्त माझ्या मस्तकी ठेवावा ही शक्ती तुमच्या हातात होती तिने आतापासून तुम्हीच मला शिकवलेल्या शाबर विद्येच्या यशासाठी माझ्या मुखी माझ्या जिभेवर विराजमान व्हावे व मंत्र शक्ती म्हणून कार्य करावे.
शिव म्हणाले तू म्हणतोस तसेच करीन पण आधी या कालिकेला उठव तर खरे तुझे अस्त्र तू मागे घे . तेव्हा शंकराच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्र आणि वाताकर्षण मंत्र मागे घेतला. पालिकेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागला ती उठली इकडे तिकडे पाहू लागली शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षिल्याबद्दल स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले जशी तू माझ्या हाती शक्ती म्हणून इतकी वर्ष राहिलीस तशी यापुढे मच्छिंद्र च मदतीला जाऊन जगत उपकाराचे कार्य करावे ही माझी विनंती आहे.
Navnath bhaktisar adhyay 6
अध्याय सहा चा विडिओ पाहण्यासाठी येथे लाल लिंक कर क्लीक करा .
कालिका हसून म्हणाली स्वामी मी तुमची दासी सांगाल तिथे जाईन व सांगाल ते काम करीन. मग तिने मच्छिंद्रनाला जवळ घेतले म्हटले बाळ तुझ्या काव्यमंत्र्यातून जिथे माझे नाव उच्चारशील तिथे ती सिद्धी देईल, Navnath bhaktisar adhyay 6 नुसार त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्र च्या स्वाधीन करून शिव कैलास ला गेले. मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला.
नवनाथ भक्तीसार च्या सर्व अध्याची सारंश कथा वाचण्यासाठी मराठीकार्ड.कॉम या आपल्या मराठी वेबसाईट ला रेगुलर visit भेट द्या .