varkari sampraday aani parampara
varkari / वारी म्हणजे नक्की काय ?
वारी म्हणजे महाउपासना .अनेक जण अनेक ठिकाणी ज्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थान वर दर महिन्याला किंवा दर वर्षाकाठी जात असतात ,त्यालाच आपण सोप्या भाषेत वारी असे म्हणू , कोणी मल्हार मार्तंडाची वारी करत असेल , कोणी जोतिबाची , कोणी कोल्हापूरची . कोणी अमुक गडावर कोणी एखाद्या बाबा कड देखील वारी करत असेल .
पण वारी या शब्दाची मूळ ओळख करून द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला पंढरपूर च्याच वारीचे(आषाढ शुद्ध एकादशी किंवा देवशयनी एकादशी ) नाव घ्यावे लागेल ,एवढा इतिहास या वारीचा मोठा आहे आणि जे लोक असा प्रवास करतात त्यांना varkari म्हणतात .
varkari sampraday aani parampara मध्ये वारी चे दोन अलिखीत प्रकार सांगण्यात येतात .
१ .ते म्हणजे एक देवाची वारी आणि दुसरी संतांची वारी , महिन्याचा पहिल्या एकादषी ला पंढरपूर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी केलेली वारी . varkari ज्यामध्ये पांडुरंगाचे दर्शन घेणे ,चंद्रभागेत स्नान करणे प्रदिक्षणा करणे .
२ . त्या दुरसी हि संतांची वारी ,संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर , संत नामदेव , गोरोबा कुंभार ,चोखामेळा अश्या यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेणे .
varkari sampraday aani parampara मध्ये वर्षातील चार महत्वाच्या वाऱ्या ?
१. चैत्र वारी
२.माघवारी
३.कार्तिकी वारी
४.आणि आषाढी वारी
एका वर्षांमध्ये या चार वाऱ्या कराव्या असे संत आपल्याला सांगतात , आणि तेही जमत नसेन तर वर्षाकाठी एका तरी वारीला जावे म्हणून आषाढी या वारी ला आपल्याला १० लाखापेक्षा जास्त लोक या आषाढी वारी मध्ये आलेले दिसतात . आषाढ सोडून इतर तीन वाऱ्यामध्ये वारकरी हा आपापल्या गावावरून थेट पंढरपूर ला जात असतो .
पण आषाढी वारीचे एक विशेष महत्व असे कि या वारी varkari sampraday aani parampara आपल्याला संताबरोबर वारी करण्याची संधी मिळत असते . आपापल्या श्रद्धा स्थान असलेल्या दैवतांनाच्या मध्ये पालखी पादुका रुपी ठेवून ते विठ्ठल दर्शनासाठी निघतात .
या वारी प्रकारांमधील सर्वात जुनी परंपरा हि ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांची आहे . तुकाराम महाराजांच्या आधीच्या आठ पिढ्यापासून त्यांच्या घरी वारी चालू आहे असा उल्लेख आढळतो .
किती जूनी आहे वारी varkari sampraday aani parampara ?
उपलब्ध पुराव्यानुसार वैकुंठवासी संत मामासाहेब दांडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच इतर अभ्यासक varkari संतानुसार , माउली ज्ञानेश्वर महाराज यांचे आजोबा हे वारकरी होते , व संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांचे आठवे पूर्वज हे विश्वंभर बाबा हे होते ,विश्वंभर बाबाच्या आईने त्यांना असे सांगितले होते कि त्यांच्या घरामध्ये वारी ची परंपरा हि पूर्वापार चालू आहे ती तू तशीच चालू ठेव .
आषाढी वारी वेळापत्रक २०२४ :
नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आषाढी वारीचे वेळापत्रक. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी कमिटी याद्वारे हे दरवर्षी प्रसिद्ध केले जाते. त्यामध्ये कमीत कमी बदल करून पूर्वपार चालत आलेली प्रथा व मार्ग ते ठरवले जातात.
यावर्षीची म्हणजेच 2024 ची संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्था येथील पालखी दिनांक 29 शनिवार सायंकाळी चार वाजता आळंदी येथील पंढरपूर कडे जाण्यासाठी प्रस्थान झालेली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप आळंदी येथेच राहतो.
30 जून व एक जुलै या दोन दिवशी पालखी पुण्यामध्ये मुक्कामास असेल. एक जुलै च्या पुणे मुक्कामानंतर पालखी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 जुलैला सासवड कडे रवणा होती. दोन जुलै आणि तीन जुलै या दोन दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांची पालखी सासवड येथे मुक्कामी असते.
सासवडच्या मुक्काम नंतर माऊलींची पालखी जेजुरी येथे येते. व चार जुलै चा मुक्काम हा varkari जेजुरी मध्येच होतो. जेजुरी ग्रामस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत खूप उत्साहाने करतात. तिथून पुढे पाच जुलैला पालखीचा मुक्काम हा वाल्या येथे झाला. पुढे सहा आणि सात जुलैला माऊलींची पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल.
तसेच आठ जुलैला माऊलींची पालखी तरडगाव येथे मुक्कामी असेल नऊ जुलैला माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटण येथे असेलत्या नंतर १० जुलै ला पालखी मुक्काम बरड येथे मुक्काम नियोजित असेल .
११ जुलै ला नातेपुते ,१२ जुलै ला माळशिरस , १३ जुलै ला वेळापूर ,१४ जुलै ला भंडी शेगाव येथे , १५ जुलै ला वखडी तेथे मुक्काम आहे .व १६ जुलै आषाढी शुद्ध दशमी ला माउली ची पालखी पांढुरपूर मध्ये असेल .१७ जुलै ला आषाढी एकादशी आहे .तसेच २० जुलै पर्यंत पालखी सोहळा पंढरपूर मधेच असणार आहे .त्यानंतर २१ जुलै ला पालखीचा प्रवास सुरु होतो .७ दिवसात पालखी आळंदीला पोहचते .
पंढरपूरची वारी का करावी त्याचे फळ काय ?
varkari sampraday aani parampara मध्ये पंढरीची वारी करून पांडुरंगाला आलिंगन दिल्यास जिव आणि शिव या दोघांना समाधान मिळते ते अतुलनीय आहे ,म्हणून एकदातरी हा अनुभव घ्यावा .
”पुजोजाता विठोबाशी ,वैकुंठवासी ते होती ” varkari पंढरपूर ला जाऊन जर तुम्ही पांडुरंगाची पूजा करत असाल तर तुम्हाला वैकुंठाला जाण्याची संधी मिळते .असे संत निळोबा राय यांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहून ठेवले आहे .
काई महिमा वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती , पंढरपूरच्या पांडुरंगाच्या फक्त मुख दर्शनाने कोटी ब्रम्ह हत्येचे पाप जाते व जीव निर्दोष होतो .
मंदिराबाहेर राउळाला उजवी प्रदिक्षणा घेतल्याने पापांच्या राशी जळून जातात असे नाथ सांगतात , उजवे घेत राउळाशी जळती पातकांच्या राशी .
नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा सारांश वाचण्यासाठी लाल लिंक वर क्लिक करा .