India post payment bank 2024 च्या CSP साठी करा अर्ज , इंडियन पोस्ट great news

India post payment bank 2024 च्या CSP साठी करा ऑनलाइन अर्ज :: मित्रांनो आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की इंडिया पोस्ट पेमेंट बँक या पोस्टाच्या संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा स्कीम ची घोषणा केली आहे यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच जनसेवा केंद्र उघडण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये आतापर्यंत आपल्याला कुठलीही कामे करायची असतील तर आपल्याला ज्या त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊनच ते काम करता येत होते यामध्ये बँकेच्या चकरा मारण्यामध्ये ग्राहकांची गैरसोय होत असल्याकारणाने व बँकेच्या ठराविक वेळेमध्ये ग्राहकांच्या ज्या काही समस्या किंवा कामे असतील त्यांचे समाधान झाल्यामुळे बँकेने India post payment bank CSP चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यास की अंतर्गत पात्र नागरिकांना India post payment bank CSP चा ऑनलाईन अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली आहे व त्या रूपाने ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा ग्राहकांना या CSP मध्ये देखील मिळणार आहेत. याची सर्व ग्राहकांनी तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी देखील दखल घ्यावी.

बँक ऑफ महाराष्ट्राची १९५ जागांसाठी नुकतीच भरती जाहीर झाली आहे ,लाल लिंक वर पहा डिटेल्स .

स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच इतर नॅशनल बँक जशा आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी बँके व्यतिरिक्त बाहेर बाजारामध्ये आपल्या CSP चालू करण्याच्या परवानग्या देतात तसेच या IPPB बँक द्वारे सुरू करण्यात येत आहे.

नवीनच चालू होणाऱ्या India post payment bank च्या CSP केंद्राबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न तसेच शंका तयार झाले असतील, त्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा आपण प्रयत्न करू जसे की ही स्कीम नक्की काय आहे?, याचे फायदे कोणाला व कसे मिळतील?, हे केंद्र कोण चालू करू शकेल? , याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न करू.

IPPB चे CSP म्हणजे नेमके काय?

India post payment bank  ही एक भारतीय डाक विभागाची महत्त्वपूर्ण बँक आहे ज्या द्वारे ग्राहकांना सेवा पुरविली जाते. तसेल या बँकेने नुकतीच CSP म्हणजे customer service point ची घोषणा केली आहे. ज्यामध्ये बँकेच्या ग्राहकांना बँके व्यतिरिक्त SERVICE POINT वर देखिल सर्व बँकिंग च्या सुविधा उपलब्ध असतील.

या कस्टमर सर्व्हिस सेंटर वर फक्तं इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या सुविधा मिळू शकतील. जसे की इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडणे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मधील अकाउंट मध्ये पैसे टाकण किंवा काढणे.

इतर  कुठल्याही बँकेच्या सुविधा मिळणार नाही. कोणीही सामान्य नागरिक जो की हा अर्ज करण्यास नियमानुसार पात्र असेल असा कोणीही नागरिक इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP चालू करू शकतो आणि बँक देत असलेल्या सर्व सुविधा तो आपल्या CSP मार्फत देखील ग्राहकांना देऊ शकतो.

IPPB CSP अधिक ची माहिती

India post payment bank बँकेमार्फत एक अधिसूचना प्रसारित केली जात आहे व त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत ज्यामध्ये जो कोणी बँकेचे जनसेवा केंद्र उघडून बँकेच्या व्यवहाराच्या कमिशनवर पैसे कमाव इच्छितो अशा लोकांसाठी या अर्ज मागवण्यात येत आहेत.

CSP मध्ये खातेदारांच्या होणाऱ्या व्यवहारावर त्या CSP धारकांना कमिशन रुपी काही रुपये मिळतात.

IPPB CSP चे फायदे ?

1.इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे CSP हे एक डिजिटल दालन आहे ज्यामध्ये बँकेच्या पेमेंट संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. 

2. जागोजागी आशा बँकेच्या CSP उघडल्यानंतर याचा फायदा ग्राहकांना आपल्या वेळेची बचत करण्यामध्ये होऊ शकतो व कमी वेळेमध्ये व बँकेमध्ये न जाता त्यांची कामे बाहेरच्या बाहेर होऊ शकतात, त्यांना पैसे काढणे किंवा पैसे टाकण्यासाठी बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

3. बँकिंग विषयीच्या छोट्या-मोठ्या अडचणी जसे केवायसी करणे, हयात प्रमाणपत्र मिळवणे, खात्यावरचे बॅलन्स चेक करणे, बँक खात्याला आधार किंवा पॅन लिंक करणे, अशा सर्व गोष्टी या बँकेच्या CSP च्या माध्यमातून पूर्ण होतील.

4. अशा प्रकारच्या बँकेच्या सीएसपी मुळे रोजगार निर्मिती होऊ शकते.

5. साधारणतः एक सीएसपी ऑपरेटर महिन्याकाठी किमान 25 ते 30 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम बँकेच्या ग्राहकांच्या व्यवहारावर त्याला कमिशन रुपी मिळतात.

IPPB CSP द्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा::

जो व्यक्ती India post payment bank CSP चालू करेल त्याला बँकेच्या ग्राहकांना खालील सुविधा पुरवण्यास तो बांधलेला असेल.

1. इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडणे.

2. बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करणे.

3. बँकेच्या अकाउंट मधून ठरवून दिलेल्या लिमिटच्या आत मध्ये पैसे काढून देणे.

4. बँकेसंबंधी वेगवेगळे अर्ज ग्राहकांना पुरवने.

5. ग्राहकांना लोन सुविधा उपलब्ध करून देणे.

6. बँकेचे स्टॅम्प सेल करणे.

7. बँकेद्वारे दिले जाणाऱ्या इतर काही सुविधा देखील सीएसटी धारकांना पुरवाव्या लागतील.

CSP चालू करण्यासाठीची पात्रता ::

1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक छोटासा दुकान किंवा जागा असावी.

2.CSP चार्ज करण्यासाठी अर्जदाराने कमीत कमी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.

3.CSP चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

4.CSP साठीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे स्वतःचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये असावे नसेल तर तसे त्याने अर्ज करण्याआधीच उघडून घ्यावे.

 

CSP चा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र ::

1. ओळखपत्र

2. आधार कार्ड पॅन कार्ड

3. दहावी किंवा बारावीचे मार्कशीट

4.CSC CERTIFICATE उपलब्ध असेल तर.

5. India post payment bank  मधील खाते पासबुक

6. India post payment bank  मधील खात्याचे स्टेटमेंट

7. रहिवासी दाखला.

8. शॉप ॲक्ट लायसन्स किंवा शॉप रजिस्ट्रेशन

9. कॅरेक्टर सर्टिफिकेट

10. पासपोर्ट साईज फोटो

11. चालू असलेला एक ईमेल आयडी

12. चालू असलेला एक मोबाईल नंबर

13. ज्या जागेवरती CSP सेंटर चालू करायचे आहे त्या जागेची जिओ TAGGING.

कसा करावा अर्ज ? 

खाली दिलेली ऑनलाइन प्रक्रिया करून तुम्ही CSP चा फॉर्म भरू शकता

1. सर्वात आधी तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर म्हणजेच ippbonline.com वर जावे लागेल.

2. या संकेतस्थळ मुख्य पानावरती तुम्हाला सर्विस रिक्वेस्ट असे ऑप्शन दिसेल तो निवडून त्यावर कक करावे.

3. त्यानंतर त्यामध्ये दिसणाऱ्या विकल्पापैकी तुम्हाला नॉन IPPB CUSTOMERS हा विकल्प निवडायचा आहे.

4. वरील विकल्पांमध्ये तुम्हाला पार्टनर शीप विथ अस हा पर्याय निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला सीएसटी चा ऑनलाईन अर्ज करण्याचा फॉर्म मिळेल तो फॉर्म काळजीपूर्वक सोबत सांगितल्याप्रमाणे प्रमाणपत्र जोडून तो दाखल करावा.

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment