ITR FILING करताना पडणारे २० प्रश्न आणि त्याची उत्तरे जाणून घेऊयात मित्रांनो , जुलै महिना हा income टॅक्स भरण्याचा महिना असतो , बऱ्याच टॅक्स payers ला हा महिनाच येऊ नये असं देखील वाटत असत पण आता टॅक्स भरल्या शिवाय तर पर्याय नाही ,आपल्या कमाईवर टॅक्स देणं हे तर बंधनकारक आहे . जुलै महिन्या अखेर आपल्याला टॅक्स भरन आवश्यक असत .
INCOME TAX डिपार्टमेंट च्या site वरून आपल्या रिटर्न ITR FILING फाइल करताना आपल्याला पडणारे काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत .
१. AY २०२४ ते २०२५ मध्ये काही करदात्यांचा रिटर्न फाइल करताना ITR १ आणि ITR ४ हा फॉर्म उघडत नाही ?
- जर कर दात्याचे उत्पन्नाचा विशेष दर असेल तर अश्या उत्पन्न साठी करदात्यांचा TDS कापला जात नाही , जसे ११५ BB मधील करदात्याला ITR १ आणि ITR ४ हा फॉर्म लागू होत नाही आणि तो उघडणार देखील नाही .तो ऑपशन त्यांच्या साठी धूसर राहील .
२. आर्थिक वर्ष २०२४ आणि २०२५ साठी ITR FILING करताना VIA SHEDULE सक्षम केलेला नाही ?
- या वर्षी पासून म्हणजे आर्थिक वर्ष २०२४ ते २०२५ पासून नवीन कर प्रणाली उपयोगात आणली गेली आहे या मध्ये टॅक्स प्रणाली हि डिफॉल्ट झालेली आहे आणि त्या मुळे VIA कपात करू शकत नाही . INCOME TAX कायदा १९६१ च्या ११५BAC नुसार करदात्याला कोणताही कपातीचा दावा द्यायचा असेल तर करदात्याने ITR १ मध्ये झ जुनी कर प्रणाली निवडणे आवश्यक आहे .
३. रिटर्न भरताना bank account validation error येत असेल तर तो कसा दूर करावा ?
- सर्वात अगोदर करदात्याने बँकेच्या सर्व डिटेल्स बरोबर भरल्या गेल्या आहेत का त्या पाहाव्या , my bank account या option मधील सर्व माहिती व्यवस्तीत तपासून घ्यावी व काही दुरुस्ती असेल तर ती करावी . किंवा ITR दाखल करण्याआधी MY पPROFILE टॅब वरून काही दुरुस्ती असेल तर ती करून घ्यावी .
४. जर करदात्याला एखाद्या लॉटरी मधून किंवा एखादे मोठे बक्षीस लागले असेल तर तो ITR १ किंवा ITR ४ दाखल करू शकतो का ?
- या प्रकारच्या इनकम मध्ये जर करदात्यांचा त्या उत्पन्नावर TDS कापला गेला असेल तर त्याला ITR १ किंवा ITR ४ दाखल करण्याची परवानगी नसते .याच साठी करदात्यांना तपासणी शिफारस केली जाते .
PODCAST च्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर येथे क्लिक करा .
५.जर करदात्याने १०IEA चा फॉर्म भरला असेल आर्थिक वर्ष AY २०२४ ते २०२५ साठी जुनी कर प्रणाली अनिवार्य आहे का ?
- हो , जर करदात्याने १०IEA चा फॉर्म भरला असेल आर्थिक वर्ष AY २०२४ ते २०२५ साठी त्याला जुणीची कर प्रणाली लागु असेल , त्याला वेगळी प्रणाली निवडता येणार नाही .
६.जुनी कर प्राणी प्रणाली निवडण्यासाठी १०IEA चा फॉर्म भरणे कोणत्या परिस्थितीत करदात्यास अनिवार्य असेल ?
- ज्या प्रकरणामध्ये व्यवसाय आणि व्यवसायाचे उत्पन्न अंतर्गत Y २०२४ ते २०२५ साठी जुनी कर प्रणाली दाखल करायची आहे .त्या साठी १०IEA चा फॉर्म भरणे आवश्यक आहे .
७. ITR FILING करणारे करदाता स्वतःच्या ताब्यात असलेल्या मालमतेच्या कर्जाच्या भांडवलावर करू शकतील का ?
- आर्थिक वर्ष AY २०२४ ते २०२५ पासून सुरु असलेल्या नवीन नियमानुसार स्वतःच्या ताब्यात असेलेल्या मालमत्ते साठी कर्ज घेतलेल्या भांडवलावर व्याजाचा दावा करू शकत नाही .
- १९६१ चा ११५BAC अधिनियमानुसार जर करदात्याला जुनी कर पद्धत निवडणे आवश्यक आहे .
८. आर्थिक वर्ष AY २०२४ ते २०२५ साठी ITR भरताना करदात्याला इतर कपातीचा दावा करता येतो का ?
- AY २०२४ ते २०२५ पासूनची नवीन कर पद्धत हि डिफॉल्ट पद्धत असल्याने इथे कलम ११५B नुसार कलम ८०CCD वगळता VIA कपातीची परवानगी नाही .
- जर करदात्याला कोणत्याही परताव्याची मागणी करायची असेल तर तो ITR १/२ मधील होय असा पर्याय निवडू शकतो यासाठी जुनी कर पद्धती निवडणे आवश्यक आहे .
९. करदात्याचे नाव जर डेटा बेस मध्ये चुकीचे दाखवत असेल तर , हा error कसा दुरुस्त करावा ?
- तुमच्या PAN CARD वरील नाव (पहिले नाव ,मधले नाव व आडनाव ) व itr filing पोर्टल वर my profile मधील नाव हे सारखेच असायला हवे त्या मध्ये काही चूक नसावी . असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी व नंतर प्रोफाइल update करून घ्यावी .
१०. AY २०२४ ते २०२५ ITR FILING साठी करदात्याने जर फॉर्म १०IEA सबमिट केला तर तो परत घेऊ शकतो का ?
- एकदा AY २०२४ ते २०२५ साठी करदात्याने जर फॉर्म १०IEA सबमिट केला तर तो परत घेता येत नाही , कर दात्याला जर पैसे काढायचे असतील तर तो पुढच्या वर्षात विथड्रॉ करू शकेल चालू वर्षात नाही . या साठी करदात्याला जुनी कर प्रणाली निवडणे बंधनकारक आहे .
११. AY २०२४ ते २०२५ मध्ये ITR FILING करताना करदात्याला घरभाडे भत्त्या साठी दावा करता येतो का ?
- AY २०२४ ते २०२५ ची कर प्रणाली हि डिफॉल्ट व्यवस्था आहे . येथे या नवीन प्रणाली मध्ये HRA (घर भाडे भत्ता )क्लेम करता येत नाही ,जर तसे करायचे असेल तर करदात्याला ITR फाइल करण्यावेळी ITR १ मध्ये होय असा पर्याय निवडावा व ओल्ड टॅक्स रेजिमे निवडावे . तेव्हा ते HRA चा (घरभाडे भत्ता ) दावा करू शकतील .
१२. करदात्याने सर्व दुरुस्त्या करून देखील जर फॉर्म PROCEED होत नसेल व सबमिशन ला अडचण येत असेल तर काई करावे ?
- फॉर्म मधील दुरुस्त्या करून देखील जर PROCEED होत नसेल तर तो नवीन सेशन उघडून परत सबमिट करणे आवश्यक आहे . अश्याने हा issue solve होईल .