ST BUS ची ” आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ” , 2024 मध्ये पास काढण्यासाठी वाचा खालील माहिती.

ST BUS ची  ” आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ” हि योजना काही  नवीन योजना नाही , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हि योजना सण १९८८ पासून महाराष्ट्राच्या  प्रवाश्यांसाठी  राबवण्यात येत आहे .

ST BUS ची ” आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ” या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी महामंडळाने सात दिवसाच्या पास प्रमाणेच चार दिवसाचा पास देखील चालू केला आहे .

या योजने अंतर्गत सुधारित दर खालील प्रमाणे ठेवलेले आहे याची महाराष्ट्रातील इच्छुक प्रवासीयांनी नोंद घ्यावी . हे दार दिनांक ०५ जानेवारी २०२२ पासून लागू केलेले आहेत .

वाहतूक  सेवेसाठी वापरली जाणारी बस त्यानुसार पास  चे दर वेगळे आहेत ते खालील प्रमाणे ,

१. साधी बस (साधी लाल परी ,  जलद बस , रात्र सेवा बस , शहरी  बस , यशवंती बस , अंतर राज्य बस सेवा )

वरील ST BUS साठी ७ दिवसाच्या पास चे मूल्य ::

प्रौढ साठी –२०४० रुपये प्रति व्यक्ती

मुलांसाठी –१०२५ रुपये प्रति मूल .

वरील ST BUS साठी ४ दिवसाच्या पास चे मूल्य ::

प्रौढ साठी –११७० रुपये प्रति व्यक्ती

मुलांसाठी –५८५ रुपये प्रति मूल .

२.शिवशाही ST BUS अंतर्राज्यसह 

वरील ST BUS साठी ७ दिवसाच्या पास चे मूल्य ::

प्रौढ साठी –३०३० रुपये प्रति व्यक्ती

मुलांसाठी –१५२० रुपये प्रति मूल .

वरील ST BUS साठी ४ दिवसाच्या पास चे मूल्य ::

प्रौढ साठी –१५२० रुपये प्रति व्यक्ती

मुलांसाठी –७६५ रुपये प्रति मूल .

(महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या मोंत्याही बस मध्ये ५ वर्षा खालील बाळाचे तिकीट आकारले जात नाही , वरती दर्शविलेले मुलांचे पास चे दर हे पाच वर्षा पेक्ष्या जास्त वय असणारे मुलं व १२ वर्षा च्या आतील मुलांचे आहे .याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी .)

ST BUS
ST BUS
ST BUS ची ” आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ” या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी महामंडळाने चालू केलेल्या योजनेचे काही नियम व अति खालील टप्रमाणे असतील .

१. ST BUS च्या ” आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेच्या पास चा कालावधी हा चार आणि सात दिवस आहे .

२. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारची साधी बस (साधी लाल परी ,  जलद बस , रात्र सेवा बस , शहरी  बस , यशवंती बस , अंतर राज्य बस सेवा ) यांना लागू असतील . ( आंतरराज्य प्रवास ग्राह्य धरला जाईल .)

३. निम आराम ST BUS साठी वेगळे दर निश्चित करण्यात आले  नाहीत  शिवशाही बस साठी देण्यात येणारे पास शिवशाही बस सेवे सह साधी बस , निम आराम बस , sleeper बस , एअर कंडिशन बस तसेच इतर सर्व बस सेवेसाठी हाच पास लागू असेल असेल . या अश्या इतर ST BUS साठी वेगळा पास ठेवलेला नाही .

४. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजने अंतर्गत देण्यात येणारे पास १० दिवस अगोदरपर्यंत देण्यात येतील .

५. या योजने अंतर्गत जर प्रवाशाने पास काढलेला असेल तर तो पासधारक प्रवासी कोणत्याही ज्यादा बस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या कोणत्याहि ज्यादा बसेस मध्ये प्रवास करण्यास पात्र असेल , त्यासाठी त्याला वेगळा कुठलाही मोबदला देण्याची गरज भासणार नाही .

६. सदर पासवर प्रवास करणारे प्रवासी पासधारक आहे  म्हणून त्यांना बस मध्ये प्रवेश नाकारू नये तसेच त्यांना इतर सामान्य प्रवाश्याप्रमाणेच  द्यावी .

७. ST BUS च्या ” आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेच्या  अंतर्गत कोणत्याही पास धारकाला बस मधील असणासाठी विशेष योजना  किंवा रेंजेर्वेशन नसते ,पण तसे हवे असल्यास पास काढताना प्रवाशी पास धारक तसे रेसेर्व्हशन करून घेऊ शकतो .

८.ST BUS च्या ” आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेच्या  अंतर्गत प्रौढ पासधारकाला ३० किलो पर्यंत तसेच मुलं पास धारकाला १५ किलो पर्यंत प्रवासी समान विना मूल्य  नेता येईल  त्या साठी वेगळा कर द्यायची गरज पडणार नाही .

९. या योजने अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवासीयांना महाराष्ट्र राज्याच्या आंतरराज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस जेथपर्यंत जात  तेथ पर्यंत प्रवेश करण्यासाठी पास चा वापर केला जाऊ शकतो .

१०. पास धारक प्रवाश्याकडून प्रवासादरम्यान पास हरवल्यास किंवा तो कोठे हि हरवल्यास  त्या साठी दुसऱ्या पास ची मागणी करता येणार नाही किंवा त्या पास चा कुठलाही मोबदला प्रवाश्याला मागता येणार नाही .

११. सदरचा पास ज्याचा आहे त्यानेच वापरावा , त्यावर काहीही लिहू नये , पास वर काही गैरप्रकार करू नये , असे काही आढळल्यास पास रद्द देखील केला जाऊ शकतो .

हि योजना देखील जाणून घ्या 
 
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

 

१२.पास धारकांची कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास किंवा प्रवाश्याचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः प्रवाशाची असेल त्या साथ महामंडळ जबाबदार राहणार नाही किंवा कुठली मदत देखील मिळणार नाही .

१३. ST BUS च्या ” आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेच्या  अंतर्गत देण्यात येणाऱ्या पास ची मुदत पहाटे १२ नंतर सुरु असणार आहे व ती चोवीस तासाच्या दिवसाप्रमाणे रात्रीच्या १२ पर्यंत कार्यरत असेल , त्यानंतर चा प्रवास पास धारकाने  त्या पुढच्या प्रवासाचे सदरील तिकीट घेऊनच करावा .

१४. काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा st bus late झाल्यामुळे जर प्रवाशी अश्या परस्तिती मध्ये प्रवास करताना त्याच्या पास ची मुदत संपत असेल तर त्याच्या कडून जास्तीचे क=तिकीट काढले जाणार नाही .

१५. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ /वाह /सामान्य -८८/८०७२ दिनांक ०२/११/१९९८ -वाहतूक खाते परिपत्रक क्र .३०/१९९८ न्वये दिलेल्या सूचनांनुसार घरातील नातलगातील मृत्यू , भूकंप , आग लागणे , अतिवृष्टी , महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती कारणास्तव पास धारकास पास रद्द करायचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखे आधी कळवल्यास प्रति पास मागे २०/- रुपये एवढा सेवा शुल्क आकारून पास धारकाचे पैसे परत करण्यात येतील .

१६. वरील नमूद परस्तिती मध्ये पास धारकाला प्रवासाची तारीख पुढे ढकलायची असेल तर प्रवास्याचा आताच पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात येईल .

१७. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मधील संप किंवा आंदोलन या कारणास्तव जर प्रवास्याला त्याच्या पास चा उपभोग घेता आला नाही तर त्याला त्या पास वर मुदत वाढ देण्यात येईल ,( या मुदतवाढीचा कालावधी चालू पास च्या पुढील तीन महिन्या पर्यंत देण्यात येईल .)

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment