tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na ? जाणून घ्या नाहीतर होईल 2 लाखाचा दंड…

tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na
SIM CARD किती असावेत हे माहित आहेत का ?
ठरवून दिलेले लिमिट च्या बाहेर जर सिम कार्ड असतील तर होऊ शकतो तुम्हाला ५०,०००/- ते 2,००,०००/- पर्यंत चा दंड किंवा जेल वारी.

चला तर उत्तर देऊया लोकांच्या सिम कार्ड विषयीच्या प्रश्नांना.

tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na हे जाणून घेणे  देखील  खूप आवश्यक आहे .

आजच्या डिजिटल युगामध्ये आणि फास्ट फॉरवर्ड वातावरणामध्ये एकापेक्षा जास्त मोबाईलची सिम कार्ड वापरणे हे अगदी कॉमन गोष्ट असल्यासारखे झालेले आहे, दोन किंवा तीन सिम वापरणारे लोक आपल्याला खूप आढळतील. एक सिम घरच्यांसाठी तर दुसरे बाहेरच्यांसाठी.

बरेच जण कामाचा आणि घरचा नंबर वेगळा ठेवतात. तसे करणे योग्य देखील आहे. पण तुम्ही कायद्याने ठरवून दिलेल्या एका व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या सिमची लिमिट ओलांडत असाल तर तुम्हाला कायदेशीर बाबींना तोंड देऊन मोठा दंड भरावा लावू शकतो किंवा जेलवारी देखील होऊ शकते.

दहा वर्षांपूर्वी मोबाईल वापरणे किंवा एकापेक्षा अधिक SIM CARD वापरणे ह्या गोष्टी सहज शक्य नव्हते कारण तेव्हा कॉलिंग फ्री असत नव्हते. त्यामुळे लोक खर्चा पायी एकापेक्षा अधिक सिम कार्ड वापरणे त्यांना जड जाईल.

पण आजच्या या डिजिटल युगामध्ये सिम कार्ड जवळपास कंपन्या फ्री मध्ये वाटत आहेत व त्यासोबत अनेक प्रलोभनीदखील देत आहेत. त्यामुळे ग्राहकाला अधिक SIM CARD ची गरज नसतानाही लोक ते खरेदी करत आहेत. चला तर पाहू याचे बारकावे.

एका व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड असावे याची लिमिट ?

एका व्यक्तीचे नावे किती सिम कार्ड असावे हे तो व्यक्ती कुठल्या प्रदेशांमध्ये राहत आहे यावर देखील अवलंबून असते. काही प्रदेश जसे की जम्मू आणि काश्मीर , आसाम , नॉर्थ ईस्ट चे परवानाधारक सर्विस क्षेत्र (LSAs) north east licensed service area अशा क्षेत्रांमध्ये SIM CARD वापरण्याची संख्या ची सहा वर ठेवलेली आहे. डिश पातळीवर एका व्यक्तीच्या नावे असणाऱ्या सिमची संख्या नऊ सीम पर्यंत चालू शकते हे telecommunications act of 2023 मध्ये जाहीर केले आहे.

काय गरज आहे सिम लिमिट लावण्याची ?

telecommunications act of 2023 नुसार SIM CARD द्वारे अनेक गुन्हे केले जातात. एकापेक्षा किंवा अनेक सिम चालू ठेवून त्याचा गैरवापर केला जातो. वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करून ग्राहकाची फसवणूक देखील केली जाते अशा सिम कार्ड वर लक्ष ठेवण्यासाठी आणि यांना बंधन घालण्यासाठी ही लिमिट लावलेली आहे.

नऊ पेक्षा जास्त Sim वापरणाऱ्यास काय आहे दंड ?

जर एखादा व्यक्ती टेलिकम्युनिकेशन 2023 चे उल्लंघन करत असून नऊ पेक्षा जास्त SIM CARD जर तो एकाच वेळी वापरत असेल तर अशा व्यक्तींसाठी सरकारने जर तो पहिल्यांदाच या कायद्याचे उल्लंघन करत असेल तर त्याला 50,000/-रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो.

tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na यांच्याकडे तुमचं लक्ष असायला हवं .

तसेच तो जर या गुन्ह्याची पुनरावृत्ती करत असेल तर त्याला त्या गुण्याचा दंड 2,00,000/- पर्यंत भरावा लागू शकतो. वरील नमूद केलेल्या नऊ sim च्या लिमिटमध्ये बंद असलेले सिम कार्ड विषय मोजले जात नाहीत. पण तुमच्याकडे जर नऊ पेक्षा अधिक sim एकाच नावे कार्यरत असतील तर तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला देखील मोठ्या रकमेचा दंड भरावा लागू शकतो

टेलिकम्युनिकेशन 2023 नुसार जर एखादा व्यक्ती फ्रॉड करून वेगवेगळे SIM CARD गोळा करत असेल तर त्याला तीन वर्षे च्या फक्त मजुरीच्या शिक्षेची प्रावधान या कायद्यामध्ये आहे व त्यासाठीचा दंड त्या व्यक्तीला 50 लाखापर्यंत भरावा लागू शकतो.

तुमच्या नावे तर कोणी घेत नाही ना सिम कार्ड? कसे ओळखावे ?

सिम कार्ड कंपनींना एका व्यक्तीच्या नावे किती SIM CARD अद्यावत चालू आहेत याची माहिती लगेच मिळू शकते. जर तुमच्या नावे तुमच्या व्यतिरिक्त कोणी अनेक सिम कार्ड खरेदी करत असेल तर त्याची माहिती तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मध्ये मिळू शकते.

यासाठी तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमची बेसिक माहिती देऊन तुमच्या नावे किती सिमकार्ड अद्यावत चालू आहेत याची माहिती तुम्ही सहजगत्या घेऊ शकता.

आणि tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na जर तुम्हाला तुम्ही वापरणाऱ्या sim व्यतिरिक्त जर इतर नंबर त्या पोर्टलवर तुमच्या नावे आढळून आले तर तशी रीत सर कंप्लेंट देखील तुम्ही त्या पोर्टलवर करू शकता.

tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na जर होत असेल तर तसा गैर वापर टाळण्यासाठी एक कायदा देखील आहे . तो खालील प्रमाणे

डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन 2021 चा कायदा काय सांगतो ?

डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन 2021 नुसार एखाद्या व्यक्तीच्या नावावर अगोदरच नऊ पेक्षा जास्त सिम कार्ड अद्यावत चालू असतील तर अशा व्यक्तींसाठी re-verification process ठरवून दिलेले आहे.

या प्रोसेस मध्ये नऊ पेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या व्यक्तींना री व्हेरिफिकेशन मध्ये तीन पर्याय दिले जातात ज्यामध्ये एक तर त्याला अतिरिक्त SIM CARD सरंडर करण्याचे आदेश दिले जातात किंवा ते ट्रान्सफर करण्याची मुभादेखील दिली जाते अन्यथा त्याला ते अतिरिक्त सिम SIM CARD बंद देखील करावे लागतात.

या डिपार्टमेंट ऑफ टेलेकम्युनिकेशन 2021 च्या नियमामुळे बऱ्यापैकी tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na  हे टाळू शकता . पाच वर्षांपूर्वी किंवा त्याआधी कोणाचेही आधार कार्ड ची झेरॉक्स वापरून कोणीही सिम कार्ड घेऊ शकत होते, पण या कायद्यानुसार सिम कार्ड घेताना आपल्याला आपल्या अंगठ्याचा ठसा तसेच लाईव्ह फोटो ॲप द्वारे टेलिकम्युनिकेशन सर्विस प्रोव्हायडर कंपनीला अपलोड करावा लागतो. अशा प्रोसेसमुळे सिम कार्ड चा गैरवापर टाळण्यामध्ये मोठे यश आलेले आहे.

ITR FILING करताय ! तुम्हाला पडलेत का हे 12 प्रश्न , जाणून घ्या उत्तर… 
          येथे क्लिक करून 
असे तपासा तुमच्या नावे किती सिम कार्ड आहेत ?

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या सुविधेसाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी सुरुवातीलाच एक ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहे याचे नाव ” संचार साथी “असे ठेवलेले आहे.

खाली दिलेल्या क्रमानुसार तुम्ही तुमच्या नावे असलेले सिम कार्ड किती आहेत याचा शोध घेऊ शकता.

1. सर्वात सुरुवातीला तुम्हाला www.sancharsaathi.gov.in संचार साथी या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करायचे आहे.

2. या पोर्टलवर तुम्हाला पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधांचे ऑप्शन दिसतील.

3. त्या ऑप्शन पैकी लर्न अबाउट युअर मोबाईल कनेक्शन ( learn about your mobile connection ) नावाचे ऑप्शन निवडायचे आहे .

4. त्यानंतर तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या दहा अंकी मोबाईल नंबर त्यावर टाकायचा आहे.

5. त्यानंतर तुम्हाला Captcha Code टाईप करून तो भरायचा आहे.

6. कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही वेबसाईटच्या आत मध्ये जाऊ शकाल.

7. इथे तुम्हाला VIEW registered SIM card नावाचा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावे असलेले आतापर्यंतचे सर्व सिम कार्ड चे नंबर तुमच्या आधार कार्ड च नंबर सोबत दिसतील.

8. जर जर तुमच्या व्यतिरिक्त कोणी तुमच्या नावे सिम कार्ड घेत असेल तर अशा सिम कार्ड च तक्रार तुम्ही त्या पोर्टलवर करू शकाल.

९ . सिम कार्ड वापरण्याबरोबरच tumchya sim card cha gair vapar tr hot nahi na हे पाहून घेणं देखील खूप महत्वाचे आहे .

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment