cmyk yojana maharashtra मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024, या लेखांतर्गत आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या या नवीन योजनेची माहिती.
ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठीची पात्रता व कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ.
महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी विशेषता बेरोजगार तरुणांसाठी ही स्कीम त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी व त्यांना कौशल्य मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केले आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे प्रत्येक पात्र उमेदवारास दर महिन्यासाठी दहा हजार रुपये शिक्षण फीस म्हणून देण्याचे ठरविले आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची सर्व माहिती वाचण्यासाठी व अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.
cmyk yojana maharashtra युवा कार्यप्रशिक्षण योजना काय आहे ?
ही एक महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुरू केलेली कौशल्य विकास योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत 2024 ते 2025 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये याची तरतूद केलेली आहे व तसेच 27 जून 2024 रोजी योजना सुरू देखील केली आहे.
मुख्यमंत्री लाडके बहिण योजना ⇒ | येथे वाचा |
cmyk yojana maharashtra उद्देश ::
महाराष्ट्रामधील युवकांमध्ये कौशल्य विकास करून त्यांना चांगल्या नोकऱ्या व तसेच त्यांच्या मदतीसाठी विविध क्षेत्रातील कार्य प्रशिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. याच हेतूने महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या बरोबरच त्यांना दरमहा सहा हजार ते दहा हजार रुपये ट्युशन फीस देण्यात येणार आहे.
cmyk yojana maharashtra युवा कार्य प्रशिक्षण योजना ची काही ठळक माहिती::
- योजनेचे नाव –मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
- कोणाच्या अंतर्गत—महाराष्ट्र शासन अंतर्गत
- योजनेचे लाभार्थी—महाराष्ट्रातील युवक व युवती
- योजनेचा काय लाभ–कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच भत्ता
- योजनेची सुरुवात—27 जून 2024
- योजनेचा उद्देश—निशुल्क कौशल्य विकास व रोजगार निर्मिती
- अंमलबजावणी संस्था—कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य.
- दरवर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस या स्कीम मध्ये आहे.
- कौशल्य विकास योजनेचा कालावधी जास्तीत जास्त सहा महिन्यांचा असेल.
cmyk yojana maharashtra च्या पात्रता ::
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठीच्या पात्रतेच्या अटी खालील प्रमाणे असतील.
- योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे व तसेच जास्तीत जास्त 35 वर्ष वय असावे.
- अर्ज करण्याचा उमेदवार हा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्ज करणारा उमेदवार हा बेरोजगार असावा.
cmyk yojana maharashtra काय आहे लाभ ? ::
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी उमेदवारांना कौशल्य विकासासोबत खाली दिल्याप्रमाणे विद्यावेतन देखील मिळणार आहे.
दहावी पास विद्यार्थी साठी | ६०००/- प्रति महा |
ITI किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी | ८०००/- प्रति महा |
पदवीधर / पदवीत्तर पदवी विद्यार्थ्यांसाठी | १००००/- प्रति महा |
वर नमद केलेला भत्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने विद्यार्थ्याच्या खात्यावर डायरेक्ट जमा केला जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तसेच बँक खाते एकमेकांशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत वरील तक्त्यानुसार उमेदवारास विद्यावेतन शासनाद्वारे देण्यात येईल तसेच प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना दैनिक हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने देणे बंधनकारक असेल.
या ऑनलाइन हजेरीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला जमा करण्यात येईल.
तसेच या विद्या वेतनामध्ये जर उद्योजकाने किंवा त्या आस्थापनेने सुट्टी किंवा रजा मान्य केलेली असेल तर ती देखील त्या वेतनामध्ये ग्राह्य धरली जाईल.
आस्थापनेला किंवा उद्योजकाला जर उमेदवारांना अधिकचे वेतन देण्याची इच्छा असेल तर तसे ते अतिरिक्त स्वरूपात देऊ शकतात.
उमेदवार जर प्रशिक्षण केंद्र वरती महिन्यातून दहा दिवसापेक्षा जास्त गैरहजर असेल तर त्या प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही.
या योजनेचा लाभ उमेदवाराला एकदाच घेता येईल
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र मधील जवळपास 50 हजार पात्र उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच विद्यावेतन देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करून आत्मनिर्भर बनवणे आहे तू घेऊन महाराष्ट्र शासन काम करत आहे.
योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग व तसेच महामंडळ यांच्यामार्फत विना अनुभवी इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग व महामंडळे यामध्ये प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी देण्यात येणार आहे. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल या सहा महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यावेतन देखील देण्यात येईल.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे एक प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. ते प्रमाणपत्र त्यांना भविष्यामध्ये रोजगार मिळवण्यास उपयोगी पडेल.
तसेच जर प्रशिक्षण पुरवणाऱ्या आस्थापना यांना उमेदवार कामासाठी योग्य वाटत असेल तर ते त्यांना आपल्या स्थापनेमध्ये योग्य तो मोबदला ठरवून कायम करून घेऊ शकतात (हा निर्णय आस्थापना व उमेदवार यांच्या दोघांमधील राहील).
cmyk yojana maharashtra योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना खालील कायदे लागू होणार नाहीत .
1. किमान वेतन कायदा
2. राज्य कामगार विमा कायदा
3. कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा.
4. कामगार नुकसान भरपाई कायदा
5. औद्योगिक विवाद कायदा.
cmyk yojana maharashtra साठी लागणारे आवश्यक कागदपत्र ::
- उमेदवाराचे आधार कार्ड
- दहावी पास चे प्रमाणपत्र
- पासपोर्ट size फोटो
- रहिवासीचा दाखला
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड चालेल)
- एक चालू असलेला मोबाईल नंबर.
- उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी.
cmyk yojana maharashtra योजनेचा अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला rojgar.mahawayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करणे आवश्यक आहे.
1. सगळ्यात आधी उमेदवाराने वरील दिलेल्या वेबसाईटवर जावे.
2. त्या मध्ये समोरच तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य योजना (CMYKPY) अशी जाहिरात दिसेल.
3. वरील दिलेल्या जाहिरातीवर क्लिक करून आपला अर्ज भरून घ्यावा त्यामध्ये योग्य ती माहिती भरावी.
cmyk yojana maharashtra अधिक माहितीसाठी ::
उमेदवार किंवा स्थापना आपल्या जवळच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास भेट देऊन आवश्यक ती माहिती गोळा करू शकतात किंवा योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून देखील माहिती घेऊ शकतात नंबर.1800 120 8040