samudra manthan chi gosht समुद्रमंथन विष्णु पुरानामधील कथा…
samudra manthan chi gosht
सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव यांच्या समाधी स्थळासमोर केंद्रीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन सुरू असतानाच त्यामध्ये भगवान विष्णू यांची मूर्ती आढळून आली.
samudra manthan chi gosht मध्ये असे वर्णन आले आहे . त्या मूर्तीवर शेषनागाच्या पाठीवर भगवान विष्णू आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती असून समुद्रमंथनांचाही दृश्य साकारण्यात आलंय मात्र मूर्तीला इतरत्र हलवण्यासाठी आता स्थानिकांचा विरोध होताना पाहायला लागतो
Photo
विष्णुपुराण मध्ये समुद्रमंथन याचे विस्तृत वर्णन आहे. या विषयांमध्ये अमृत उत्पत्ती विषयी सखोल माहिती दिलेली आहे.
समुद्रमंथनाला सागर मंथन तसेच क्षीरसागर मंथन तसेच अमृत मंथन म्हणून देखील ओळखले जाते.
स्वर्गाचा राजा त्याच्या दैवी हत्तीवर स्वार होता तेव्हा वाटेत चालत असताना त्याची भेट ऋषी दुर्वासा यांच्याशी झाली त्याने त्याला अप्सरेने दिलेली विशेष माला अर्पण केली देवतेने माला स्वीकारली
आणि त्याच्या नम्रतेचा दाखला म्हणून ऐरावतच्या सोंडेवर फुलांना एक तीव्र सुगंध होता त्यांनी काही मधमाशा आकर्षित केल्या मधमाशांमुळे चिडलेल्या हत्तीने माला जमिनीवर फेकून दिली ऋषी संतप्त झाले .
त्यांना क्रोध अनावर झाला कारण मला हे श्रींचे निवासस्थान होते व ते प्रसाद किंवा धार्मिक प्रसाद म्हणून मानले जायचे लक्ष्मी देवी महासागरात नाहीशी झाली व क्रोधित होऊन दुर्वासा ऋषीने इंद्र व इतर सर्व देवतांना दैवी शक्ती यांच्यापासून वंचित राहण्याचा शॉप दिला.
या घटनेनंतर झालेल्या युद्धामध्ये देवांचा पराभव झाला आणि असुर राज बालीच्या नेतृत्वाखाली असुरांचा तिन्ही लोकांव ताबा मिळवण्याची क्षमता वाढली व त्यांनी तसे केले देवांनी विष्णूची बुद्धी मागितली त्यांनी त्यांना असुरांशी पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला व समुद्रमंथनाचा पर्याय सुचवला देवांनी ही देखील विष्णू भगवान चे ऐकले होते अश्रूंसोबत संयुक्तपणे समुद्रमंथनासाठी तयार झाले व विष्णू ने देवतांना आश्वासन दिले तो त्यांना अमृतप्राप्तीसाठी मदत करेल.
समुद्रमंथन मध्ये निघालेले 14 रत्न
samudra manthan chi gosht मध्ये निघालेल्या 14 रक्तांची कथा व samudra manthan त्यामागचे अर्थ आज आपण जाणून घेऊ
पंचकानुसार प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यामध्ये कृष्णपक्ष त्रयोदशी या दिवशी धन्वंतरी त्रयोदशी साजरी केली जाते पौराणिक मान्यता अनुसार याच दिवशी समुद्रमंथन होऊन त्यामधून 14 रत्ने बाहेर पडली होती.
त्यापैकीच एक म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणूनच या दिवशी कृष्ण कृष्णपक्ष त्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असे देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान धन्वंतरी यांची विशेष पूजा केली जाते.
काय आहे samudra manthan chi gosht चे रहस्य प्रत्येक रत्नमागील लपलेला अर्थ ते आपण आज एकेक करून जाणून घेणार आहोत .
समुद्रमंथनांचा उल्लेख हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी आलेला आढळून येतो याच धर्मग्रंथा नुसार एकदा महर्षी दुर्वासा यांच्या श्रापाने व्यतीत झालेले सर्व देवी देवता हे ऐश्वर्य विरहित धनविरहित आणि वैभव इत्यादींपासून मुक्त झाले होते तेव्हा सर्व देवता एकत्र येऊन महर्षी दुर्वासा यांच्या श्रापातून मुक्तीसाठी हे सर्व भगवान विष्णू यांना शरण गेले व त्यांची याचना केली.
तेव्हा भगवान विष्णू यांनी सर्व देवतांवर अनुग्रह करून त्यांना या अडचणीतून मुक्त करण्यासाठी समुद्रमंथनाचा पर्याय सांगितला भगवान विष्णू यांनी सांगितले की तुम्ही जे दैत्य आहेत त्यांच्यासोबत मिळून तुम्हाला समुद्रमंथन करावे लागेल आणि त्यामधून जामृत निघेल त्यामुळे तुमचे कल्याण करीन आणि ते अमृत घेत प्राशन केल्यानंतर तुम्ही अमर होऊन जाल.
काही देवतांनी ही गोष्ट सर्व सर्वदैत्यांचा आणि असुरांचा राजा असलेला बली याला जाऊन सांगितली ही सर्व हकीगत ऐकल्यानंतर बली हा समुद्रमंथन करण्यासाठी तयार झाला. आता एवढा मोठा समुद्र याचे मंथन samudra manthan कसे करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडला तर त्याचे उत्तर असे त्यांना सापडले की आपण समुद्रमंथनासाठी वासुकी नाग याची दोरी म्हणून उपयोग करू व मंदराचल पर्वत च्या साह्याने समुद्रमंथन करू.
samudra manthan होत असताना त्यांना त्यातून एकूण 14 रत्ने बाहेर येताना दिसली जसे उच्च श्रवा घोडा ऐरावत हत्ती भगवान धन्वंतरी अशी 14 रत्न…
समुद्रमंथन या कथेला जर आपण तार्किकदृष्ट्याने किंवा वास्तविकतेने पाहिले तर आपल्याला अनेक गोष्टी यांचा उलगडा होऊ शकतो .
आपण म्हणू शकतो की समुद्रमंथन करून कुठे अमृत मिळू शकते का किंवा परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते का परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला आधी आपले काही विकार दूर करावे लागतील.
आपल्या इंद्रियांवर संयम ठेवावा लागेल म्हणूनच samudra manthan chi gosht मध्ये samudra manthan मध्ये सांगितलेल्या 14 रत्नांचा अर्थ असाही सांगितला जातो की त्यातील पाच हे कर्मेंद्रिय आहेत पाच हे जननेंद्रिय आहेत व अन्य चार हे अनुक्रमे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आहेत या सर्व 14 तत्वांवर आपण जर विजय मिळवला तर आपणास ईश्वर प्राप्ती सहजरित्या होऊ शकते.
Photo
samudra manthan chi gosht मधील 14 रत्ने
आता आपण प्रत्येक रत्न सविस्तर सविस्तर पाहू.
1. कालकूट विष
असुर आणि देव यांच्यामध्ये झालेले रस्सीखेच व समुद्रमंथनांमधून उत्पन्न झालेले पहिले रत्न हे कालकूट विषय आहे. याचा अर्थ प्रत्येक माणसाच्या मनामध्ये परमात्मा प्रत्यक्ष असतो आणि आपल्याला तो तू परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपली मनस्थिती ठीक करावी लागेल .
सर्व वाईट विचार काढून टाकावे लागेल हे सर्व विचार च कालखुट विष आहेत असं मानलं जातं हे सर्व विचार त्यागून परमात्म्याला शरण जाणे आणि या वाईट विचारून पासून मुक्ती करून घेणे हेच या समुद्रमंथनाच्या पहिल्या रत्नाचे रहस्य आहे.
2. कामधेनु गाय
समुद्र म्हणताना मधून उत्पन्न झालेली दुसरी गोष्ट म्हणजे कामधेनु गाय काल कुठ विश आपल्या मनातून बाहेर पडल्यानंतर आपले मन अगदीच निर्विकार आणि निर्मळ होऊन जाते अशी मनस्थिती किंवा अशी निर्मळ अवस्था आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाण्यास मदत करते विचार रुपी वाईट विष बाहेर पडल्यानंतर आपण निर्मल तेच रहावे असा या दुसऱ्या रत्नाचा उपयोग आहे.
3. उच्च श्रवा घोडा
हा घोडा अतिशय पांढऱ्या रंगाचा समुद्रमंथनाच्या तिसऱ्या मंथनामध्ये निघालेला रत्न आहे. असुरांचा राजा बली यांनी हा घोडा आपल्याकडे असावा अशी इच्छा व्यक्त केली व त्या घोड्याला त्यांनी स्वतःकडे घेतले हा घोडा मनाच्या गतीच प्रतीक असा मानला जातो.
मनाची गती ही सर्व गोष्टी पेक्षा जास्त असते म्हणून अमृतप्राप्तीसाठी किंवा परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी या गतीवर आपल्याला योग्य ताबा ठेवावा लागेल तरच परमात्मा प्राप्ती आपल्याला होऊ शकेल असा या घोड्याचा तार्किक अर्थ सांगितला जातो.
4. ऐरावत हत्ती
समुद्रमंथनांमधून निघालेला चौथ्या नंबर चा रत्न म्हणजे ऐरावत हत्ती प्राचीन ग्रंथांमध्ये या हत्ती विषयी अनेक वर्णन आढळते या हत्तीला पांढरे शुभ्र असे चार मोठे मोठे दात असे या दातांची चमक कैलास पर्वताला देखील फिकी पाडत असे. या तिचं भव्य दिव्य व एकंदर स्थिती पाहता हा हत्ती आपल्याकडे असावा अशी इच्छा देवांची राजे देवराज इंद्र यांनी प्रकट केली व तो त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतला या हत्तीची अशी कथा आहे की हा हत्ती बुद्धीचे प्रतीक मानला जातो व त्याचे चकणारे पांढरे शुभ्र दात हे लोभ मोह वासना आणि क्रोध यांचे प्रतीक मानले जातात.
चमकदार म्हणजेच शुद्ध आणि निर्मळ बुद्धीनेच आपण या चारही विकारांवर काबू करू शकत असो.
5. कौस्तुभ मणी
समुद्र म्हणताना मध्ये पाचव्या क्रमांकावर मिळालेली वस्तू म्हणजे कौस्तुभ मणी. हा मनी कोणी घेण्याआधी स्वयं भगवान विष्णू यांनी तो आपल्या हृदयाशी धारण केला या या कौस्तुभ मनीला भगवान विष्णू स्वयं भक्तीचे प्रतीक मानतात तुमचे मन बुद्धी विकारहीत जेव्हा होतील तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त भक्तीच उत्पन्न होऊ शकते वही भक्ती भगवान विष्णू यांना अतिप्रिय आहे त्यामुळेच त्यांनी या भक्ती रुपी कौस्तुभ मनी स्वतः धारण केला.
6. कल्पवृक्ष
samudra manthan madhe सहाव्या क्रमांकावर बाहेर पडलेली वस्तू किंवा गोष्ट म्हणजे कल्पवृक्ष या कल्पवृक्षाला सर्व देवतांनी मिळून विष्णू देवाची प्रार्थना करून याची स्थापना स्वर्गलोकांमध्ये करून घेतली. कल्पवृक्षाला आपली इच्छा याचे प्रतीक मानले जाते जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल किंवा समृद्ध समुद्रमंथनानुसार अमृत प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सर्व इच्छांचा त्याग करावा लागेल .
मनामध्ये वेगवेगळे इच्छा उत्पन्न होत असतील भौतिक तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होणे खूप अवघड जाईल याच कारणाने समुद्रमंथनांमध्ये कल्पवृक्ष या अर्थाने आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा नसावी आकांक्षा नसावी व फक्त परमात्मा प्राप्तीची ओढ असावी असा अर्थ या कल्पवृक्षाचा मानला जातो.
7. रंभा अप्सरा
रंभानामक अप्सरा समुद्रमंथनामध्ये निघालेली सातवी अशी रत्न आहे नाना प्रकारचे दिव्य भव्य असे रत्न व आभूषण परिधान करून ही सुंदर युवती या samudra manthan tun बाहेर पडली.
तिचे सौंदर्य भल्या भल्या ऋषीमुनींना देखील भुरळ घालणारे होते व तिच्याकडे आकर्षित करून घेणारे असे होते. हे अप्सरा देवतांना शरण गेली रंभा अप्सरा प्रतीक हे मनामध्ये सुप्त अशा वासनेच आहे. जेव्हा तुम्ही कुठलेही काम हाती घेता तेव्हा सुप्त मनामध्ये कुठेतरी आपल्या मनामध्ये आशा आणि वासना निर्माण होत असते.
त्यामुळे आपले मन विचलित होऊन कार्यसिद्धी होण्यास अडथळा येत असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या स्थितीवर किंवा मनावर काबू ठेवणे अत्यंत आवश्यक असते हाच या सातव्या रत्नाचा तार्किक अर्थ मानला जातो. प्रलोभन कितीही आकर्षक व सुखदायक वाटत असले तरी आपण आपली मन बुद्धि स्थिर ठेवून सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेणे व आपली वासनेतून सुटका करून घेणे हेच योग्य ठरेल.
8. देवी लक्ष्मी
समुद्रमंथनामध्ये आठव्या क्रमांकावर निघालेले रत्न म्हणजे साक्षात लक्ष्मी होय देवगणांनी तसेच असुरांनीखूप प्रयत्न केला की लक्ष्मी आपल्या बाजूने यावी पण स्वतः लक्ष्मी भगवान विष्णू यांना शरण गेली. लक्ष्मी हिला धन वैभव संपत्ती ऐश्वर्या आणि संसारामधल्या सर्व सुखांची जननी मानले जाते जेव्हा आपण परमात्म्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा सर्व सुख समृद्धी आपल्याला प्रलोभन देत असते.
व आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत असते पण आपल्याला केवल परमात्मा प्राप्ती करायची आहे म्हणून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण परमात्म्याला शरण जावे असं याचा तार्किक अर्थ सांगितलं जातो.
9. वारुणी देवी
samudra manthan chi gosht मध्ये प्रकट झालेल्या नव्या क्रमांकाच्या रत्नाला वारुणी असे म्हणतात भगवान विष्णूंची अनुमती घेऊन सर्वदैत्यांनी वारुणी देवीला आपलंसं करून घेतलं व ग्रहण केलं वारुने याचा अर्थ मदिरा मद्य किंवा नशा असा होतो. नशा कुठल्याही गोष्टीचा असो तो धोकादायकच असतो एका सीमेनंतर त्या व्यसनाचा किंवा नशेचा वाईट परिणाम प्रकट होतो.
परमात्मा प्राप्तीसाठी तुम्हाला सगळ्यात आधी या वारुणीरुपी नशे मधून बाहेर पडावे लागेल तुम्हाला सर्व गाठी सोडाव्या लागतील व परमात्म्यालाच परमचैतन्य मानून त्याचा साक्षात्कार तुम्हाला करून घेता येईल.
10. चंद्रमा
samudra manthan chi gosht मध्ये क्रमांकावर निघालेले रत्न म्हणजे स्वयंम चंद्र होय
चंद्र या रत्नाला भगवान शिव यांनी आपल्या डोक्यावरती धारण केले चंद्र याचा सरळ अर्थ शितल तेशी आहे जेव्हा आपले मन वाईट विचार वाईट व्यसन वासना इत्यादीपासून सुटका करून घेऊ इच्छित असते तेव्हा आपले मन चंद्रमण्यासारखे शितल होऊन जाऊ शकते परमात्मा प्राप्तीसाठी निर्मळ शुद्ध असे शितल रुपी मन असावी लागते अशा चंद्र अवस्थेत असलेल्या मनालाच भगवत प्राप्ती किंवा अमृतप्राप्ती होऊ शकते असा याचा सरळ अर्थ निघतो.
11. पारिजात वृक्ष
samudra manthan chi gosht मध्ये अकराव्या क्रमांकावर निघालेला वृक्ष म्हणजे पारिजात पारिजात वृक्षाची अशी आहे का आहे की याला आपण जेव्हा स्पर्श करतो तेव्हा आपला सर्व तानशीन हा निघून जात असतो हा या वृक्षाचा गुणधर्म पाहून देवतांनी याला आपल्या आयुष्यामध्ये घेतले.
याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपल्याला कुठलीही यशप्राप्ती किंवा परमात्मा प्राप्ती होणार असते तेव्हा आपल्या मनामध्ये एक अलौकिक शांतता याचा अनुभव येत असतो.
जेव्हा एखादी कार्यसिद्धी आपण करतो तेव्हा त्या कार्यसिद्धीदरम्यान अनेक खडतर प्रवास आपण पाहिलेला असतो व त्यादरम्यान आपण अनेक प्रकारच्या ताण-तणावांमधून गेलेलो असतो पण जेव्हा आपण त्या गोष्टीला प्राप्त करण्याच्या एकदम जवळ जातो.
तेव्हा आपल्याला तो सर्व प्रवास विरळ असा होऊन जातो प्रवासादरम्यान झालेला सर्व थकवा तेथे पोहोचल्यानंतर व तिथली सुखस्थिती पाहून निश्चितच निघून गेलेला असतो हाच या पारिजात वृक्षाचा अर्थ सांगितला जातो.
12. पाचजन्यशंख
समुद्रमंथानंमधून 12 व्या क्रमांकावर जे रत्न निघाले त्याचे नाव आहे पाच जन्य शंख . या शंखाला भगवान विष्णू यांनी आपल्याकडे घेतले या शंकाला विजयाचे प्रतीक देखील मानले जाते पाच जन्यशंख यातून निघणारा ध्वनी हा अत्यंतिक शुभ असा मानला जातो जेव्हा तुम्ही ईश्वर प्राप्तीच्या खूप जवळ असतात तेव्हा मनामध्ये एक विशाल पोकळी निर्माण होते व या पोकळीमध्ये एक स्वर कायम नाद करत असतो याच स्थितीला आपण परमात्मा साक्षात्कार होण्याची वाटचाल असे म्हणू शकतो.
13 व 14 . भगवान धन्वंतरी व अमृत कलश
या शेवटच्या samudra manthan chi gosht मध्ये एक अलौकिक गोष्ट घडलेली आहे या वेळेच्या समुद्रमंथनामध्ये दोन रत्ने एकदाच बाहेर पडलेली आहेत ती म्हणजे स्वयम धन्वंतरी भगवान व त्यांच्या हातामध्ये असणारा अमृत कलश. भगवान धन्वंतरी हे निरोगी तन व निरोगी मन याचे प्रतीक मानले जातात जेव्हा तुमचे तन तसेच मन आतून आणि बाहेरून पवित्र होऊन जातील तेव्हाच तुम्हाला परम चैतन्य ईश्वर प्राप्ती होऊ शकते.
समुद्रमंथनामध्ये हलाहल नावाचे विष देखील तयार झालं होतं ते विष पाहून सर्व देवता व दानव भयभीत झाले होते. सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांचा धावा केला व त्यांना शरण गेले तेव्हा भगवान शंकर यांनी ते विष प्राशन करून घेतले.