mahajyoti yojana registration 2024 madhe विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील सूचनांचे पालन करावे लागेल.
उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स आणि इतर बाबी
1.उमेदवार याच्याकडे एक चालू ईमेल आयडी असणे आवश्यक आहे .
2. उमेदवारीची प्रोफाईल तयार करणे वेळेस त्याच्याकडे चालू असलेला एक मोबाईल क्रमांक असावा
3. उमेदवाराकडे अलीकडे काढलेला एक पासपोर्ट साईज फोटो व त्याची साईन स्वाक्षरी खालील दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करून ठेवलेली असावी.
4. फोटोची साईज 50 ते 100 केवी व त्याचे फॉरमॅट जेपीजी जे पी इ जी मध्येच असावी
5. उमेदवाराची स्वाक्षरी वीस ते पन्नास केबी या साईज मध्ये असावी व ती देखील जेपीजी किंवा जे पी इ जी या फॉरमॅटमध्ये असावी.
mahajyoti yojana registration 2024
पीडीएफ फॉरमॅटमध्ये आवश्यक असणारे कागदपत्र
1. दहावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
2. बारावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
3. ग्रॅज्युएशन झालेली प्रमाणपत्र व त्याचे मार्कशीट
4. अधिवास प्रमाणपत्र
5. आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित
6. जातीचे प्रमाणपत्र
7. नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
8. दिव्यांग प्रमाणपत्र जर लागू असेल तर
9. अनाथ प्रमाणपत्र जर लागू असेल तर
mahajyoti yojana registration 2024 लाभासाठी पात्रता
1. विद्यार्थी हा नॉन क्रिमीलेअर गटातील व इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा.
2. योजनांचा लाभ घेण्यासाठीची वयोमर्यादा
यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग दिल्ली व पुणे–21 ते 33
महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी 19 ते 41 तसेच दिव्यांग करता 43
स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल 18 ते 30 दिव्यांगा करता 40
बँकिंग रेल्वे एलआयसी यांच्यासाठी 20 ते 28 तसेच दिव्यांगांसाठी 38
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठी 19 ते 40 तसेच दिव्यांगा करिता 45
कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याआधी उमेदवाराने आपला अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना लक्षपूर्वक वाचावे व त्याचे पालन करावे.
1. उमेदवाराने सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील दिलेल्या लिंक वर जावे.
2. ती लिंक उघडल्यानंतर त्यावरील न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करावे.
3. आपली वैद्य माहिती त्यामध्ये भरून ठेवावी तसेच लाल रंगांमधील माहितीचे कक्ष हे उमेदवाराने भरून पूर्ण करणे बंधनकारक आहे
4. उमेदवारांनी आपली माहिती पूर्ण भरल्यानंतर जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावरती उमेदवाराला एक रजिस्ट्रेशन नंबर व एक पासवर्ड मिळेल
5. संपूर्ण फॉर्म मरेपर्यंत हा पासवर्ड उमेदवारांना उपयोगी पडणार आहे
6. एप्लीकेशन फॉर्म मधील माहिती अपुरी भरल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
7. सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणी अर्जामध्ये एकूण पाच टप्पे आहेत.
A. प्रोफाइल
B. बेसिक इन्फो
C. पात्रता शैक्षणिक
D. कागदपत्रे
E. प्रिव्ह्यू
8. पहिली पायरी भरल्यानंतर पुन्हा नव्याने लॉगिन करून बेसिक माहिती ही उमेदवारांनी भरायचे आहे सदर माहिती भरून झाल्यावर व्हॅलिडीटी युवर डिटेल्स या टॅबवर बटन दाबून नेक्स्ट करून पुढे जावे.
9. पुढील पायरीमध्ये आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर व्हॅलिडीटी युवर डिटेल्स तपासून सेव अँड नेक्स्ट करून पुढे जावे
10. mahajyoti yojana registration 2024 च्या फॉर्म मध्ये पुढच्या पायरीमध्ये उमेदवाराला आपले सर्व वैद्य डॉक्युमेंट्स स्कॅन कॉपी करून दिलेल्या साईज मध्ये भरावे
11.उपरोक्त दिलेल्या साईज मधील कागदपत्रे जोडल्यानंतर सेव आणि नेक्स्ट बटन दाबल्यावर आपण अपलोड केलेली कागदपत्रे खरे आहेत ना अशी विचारणा एकदा केली जाते त्यानंतर त्यापुढील ओके बटन दाबल्यावर आपला अर्ज भरला जातो.
त्यानंतर अर्जाची शेवटी एक declaration दिलेले आहे ते वाचून त्याला सहमती म्हणून I agree येथील चौकटीवर क्लिक करून खाली दिलेल्या I confirm my signature येथील चौकटीवर क्लिक करा व त्याखाली दिलेल्या final submit या बटनावर क्लिक करा यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला विचारले जाईल की तुमचा सदर अर्ज सबमिट करण्यास तयार आहात का तेव्हा ओके बटणावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा.
अर्ज एकदा फायनल सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती किंवा कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही त्यामुळे फायनल सबमिट करण्याआधी अर्ज व्यवस्थित चेक करावा आणि जर काही दुरुस्ती करायची असल्यास सबमिट फॉर्मच्या इथे कॅन्सल नावाच्या बटनावर क्लिक करा अर्जा मधे पाहिजे ती दुरुस्ती करून घ्या.
फायनल सबमिट झाल्यानंतर आपला अर्ज याच्या प्रिंट आऊट काढून घेणे व ती आपल्याकडे सेव करून ठेवणे जेव्हा उमेदवाराला mahajyoti yojana registration 2024 साठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवले जाईल तेव्हा उमेदवाराला हा अर्ज इतर मूळ कागदपत्रासोबत सादर करावा लागेल सदर अर्ज आपल्याला कोणत्याही कार्यातून पुन्हा भेटणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण यांच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक वेळी वेगळा अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये सबमिट केलेला पासपोर्ट फोटो आणि उमेदवाराची स्वाक्षरी हे CET परीक्षेत बसण्यापूर्वी तपासली जाईल व त्यामधील माहिती आणि उमेदवाराचा फोटो याची पडताळणी झाल्यानंतरच उमेदवाराला परीक्षेत बसण्याचा अधिकार मिळेल. फोटो किंवा स्वाक्षरी यामध्ये काही तफावत आढळल्यास उमेदवारांना सीईटी परीक्षेत बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि अपलोड याचे मार्गदर्शन mahajyoti yojana registration 2024
ऑनलाइन अर्ज करण्यामध्ये उमेदवाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी याचे काही नियम.
1. फोटो
2. अपलोड करण्याचा फोटो हा रंगीत असावा.
3. हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले फोटो असावा.
4. फोटोमध्ये रेड आई नसल्याचे निश्चित करावे.
5. उमेदवारांना जर चष्मा असेल तर त्या चष्म्याची प्रतिमा डोळ्यावर न येता डोळे स्पष्ट दिसावेत असा फोटो काढावा
6. डोक्यावर टोपी किंवा क***** किंवा इतर रंगाचा चष्मा वापरू नये
7. कोणताही रुमाल किंवा मास्क याने उमेदवाराचा चेहरा झाकलेला नसावा.
8. फोटो अपलोड करण्यासाठी दिलेल्या जागेवरच फोटो अपलोड करावा अन्यथा अर्ज बाद केला जाईल.
9. फोटो साईज 50-100KB (JPG/JPEG format)
यवतमाळ जिल्हा परिषद भरती च्या details पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
mahajyoti yojana registration 2024 स्वाक्षरी अपलोड करण्याचे नियम
1. अर्जदारांनी पांढरे कागदावर निळ्या किंवा शाईच्या बॉलपेन चा वापर करून सही करावी.
2. अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा क***** किंवा निळ्या शैनी पांढऱ्या कागदावर लावा.
3. परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावर आणि हॉल तिकीट वर अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यास किंवा ते अपलोड केलेले स्वाक्षरीशी मिळतील नसल्यास अर्जदाराचा अर्ज अपात्र केला जाईल.
4. स्वाक्षरीची साईज 20 – 50 kb (jpg/jpeg) format
mahajyoti yojana registration 2024 भरताना तांत्रिक अडचणी आल्यास
अर्जदाराने खाली दिलेले ईमेल आयडी किंवा संपर्क क्रमांक फोन करून आपल्या समस्यांचे समाधान करून घ्यावे.
ई-मेलच्या तक्रार तक्रार सोबत नोंदणी क्रमांक आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि उमेदवाराची जन्मतारीख नमूद केलेली असणे आवश्यक आहे.
संपर्क क्रमांक.07122870120/071287121
ई-मेल ID —-mahajyotihelpdesk.@gmail.com (mahajyoti yojana)
mahajyoti yojana registration 2024 साठीचे अधिकृत संकेत स्थळ
संस्थेचे संकेतस्थळ —mahajyotihelpdesk.org.in