नवनाथ भक्तिसार 40 कथा व त्यांची amazing फलश्रुती । navnath bhaktisar

 नवनाथ भक्तिसार कथा

navnath bhaktisar

navnath bhaktisar नवनाथ भक्तिसार कथा व  नवनाथ भक्तिसार पारायण

नवनाथ मंत्र 

या मंत्रा मध्ये सर्व नऊ च्या नऊ नाथांच्या नामाचा उच्चार होतो .म्हणून हा मंत्र नवनाथ भक्ती परिवारामध्ये खूप श्रद्धेने पुजला जातो .

ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ नवनाथाय नमःआदेश! “गोरक्ष जालंदर चर्पटाश्च अडबंग कानिफमच्छिंद्रेंद्या चौरंगीरेवाणभर्तरिद्या भूम्यांभूर्र नवनाथ सिद्धा!”आदेश आदेश नाथजी !

या लेक मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसार यांचे सर्व अध्याय व त्यांची फलश्रुती

श्री धोंडीसुत मालुकवी यांनी हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ श्री गोरक्ष किमयागार या ग्रंथा मधून लिहिलेला आहे. श्री मालूकवी हे ज्ञानदेव यांना आपले गुरु मानत असत कारण श्री ज्ञानेश्वर महाराज हे देखील नाथपंथीय होते .

मालू कवी लिखित navnath bhaktisar मध्ये श्री गणेशा बरोबरच पांडुरंगाला देखील नमन केले जाते याचे कारण ज्ञानेश्वर महाराजच होय योग , ज्ञान याच यालाच भक्तिमार्गाची जोड देणारे श्री ज्ञानेश्वर यांच्या कृपेने श्री धोंडीसूत मालूकवी यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ लिहून काढला.

श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा तसेच गीता याच प्रमाणे navnath bhaktisar नवनाथ भक्तिसार कथा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला देखील वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे निवृत्तीनाथ यांनी श्री गहिनीनाथ या नाथांकडून नाथपंथाची दीक्षा घेतली होती यांना पंथाचे सर्वात पहिले गुरू किंवा उगमस्थान हे दुसरे कोणी नसून स्वयं शिवशंकर हेच होय.

परंतु सदेह रुपी पहिले नाथ  श्री मच्छिंद्रनाथ यांनी यांना पंथाची सुरुवात केली आहे व त्यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ यांनी पूर्ण भारत भर भ्रमण  करून आपल्या गुरू सोबत राहून या यां नाथ पंत संप्रदाया प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला नाथपंथामध्ये शाबरी तंत्र मंत्र यांना खूप महत्त्व आहे.

विष्णुपुराण मधील समुद्रमंथनांची कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

navnath bhaktisar

श्री नवनाथांची पूजा व नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण पद्धत

पाळण्यासाठी शुभ दिवस पहावा , सायंकाळी सूर्यास्त च्या वेळी स्नान करून धुतलेले वस्त्र धारण करावे. घोंगडी किंवा  इतर अशी असणे असावीत. आसन आणि प्रधान करणारे वस्त्र किंवा उत्तरीय वस्त्र स्वच्छ धुतलेली असावेत. navnath bhaktisar नवनाथ भक्तिसार कथा या ग्रंथाची पारायण नेहमी सूर्य उगवण्याच्या दिशेला म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून करावे.

समाप्तीचा दिवस शुभ दिवस यावा असे वाचनाचे नियोजन असावे. वाचनाच्या ठिकाणी आपल्या असणं समोर एक चौरंग सजून त्यावरती नवनाथांचे चित्र प्रतिमा ठेवावे त्यासमोर पोती ठेवून आद्य श्री गजाननाचे स्मरण करावे. सोबतच घरातील देव्हाऱ्याचे पूजन करावे व त्यातील सर्व देवतांना वंदन करून घरच्या वडीलधाऱ्यांना देखील नमस्कार करावा .

पोथीची मनोभावे गंधपुष्पांनी पूजा करावी. नैवेद्यासाठी दूध खडीसागर पेढे किंवा जे मनोभावे शक्य होईल असा सात्विक प्रसाद वाढावा नेहमी वाचण्यापूर्वी एक समय किंवा दिवा प्रज्वलित करावा.

navnath bhaktisar वाचन पूर्ण होईपर्यंत किमान तो तेवत असावा एक निरंजन लावावे शक्य असेल तर धूप किंवा अगरबत्ती लावावी पाराण्याच्या प्रथम देशी पोथीला विड्याचे पान सुपारी नारळ व दक्षिणा अर्पण करावी नऊ दिवस ब्रह्मचारी व्रताचे पालन करावे यांनी एकाग्रतेने वाचन करावे वाचन करताना कोणाशी बोलू नये.

रात्री जमिनीवर झोपावे रोज पारायण झाल्यानंतर श्री दत्तात्रयाची आरती करावी पारायण समाप्तीच्या दिवशी नऊ लहान मुले यांना भोजन द्यावे आणि नैवेद्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ यांची खिचडी शक्य असेल तर घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही आंबील ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ असावेत .

देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर प्रसाद घ्यावा संपूर्ण श्रावण महिन्यात 40 अध्याय वाचण्याची पद्धत आहे काही दिवस दोन अध्याय वाचावेत म्हणजे ठराविक वेळेमध्ये 40 अध्याय पूर्ण होतील नेहमी वाचण्याच्या सुरुवातीला आपण नाथ महाराजांना आवाहन करून मज बरोबर या व ही कार्य सिद्धी करा अशी विनंती करू व फुल सूर्याच्या दिशेने अर्पण करावा

आता आपण navnath bhaktisar पारायण पद्धत रोज सात दिवस अध्ययन कसे करावे याची पद्धत पाहणार आहोत.

दिवस
अध्याय
पहिलाएक ते सहा
दुसरासात ते बारा
तिसरातेरा ते अठरा
चौथा19 ते 24
पाचवा25 ते 30
सहावा31 ते 36
सातवा37 ते 40

 

आता आपण नऊ दिवसाचे navnath bhaktisar ग्रंथाचे पारायण कसे करावे कोणत्या दिवशी कोणते व किती अध्याय पठण करावे हे देखील पाहू.

दिवस
अध्याय
पहिलाएक ते सहा
दुसरासात ते अकरा
तिसरा12 ते 16
चौथा17 ते 21
पाचवा22 ते 26
सहावा27 ते 31
सातवा32 ते 35
आठवा36 ते 38
नववा39 ते 40

 

आता आपण भक्ती सार या ग्रंथातील प्रत्येक अध्याय व त त्याची फलश्रुती संक्षिप्त रूपामध्ये लक्षात घेऊ
अध्यायकथाफलश्रुती
पहिलामच्छिंद्रनाथांचा जन्मसंबंध बाधा नाहीशी होते
दुसरामच्छिंद्रनाथांची तपश्चर्या व दत्त दर्शनधनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते
तिसरामच्छिंद्रनाथ व मारुती युद्धशत्रूचा नाश मुष्टीयुक्त विद्येची प्राप्ती, घरात मारुती चे वास्तव्य
चौथामच्छिंद्रनाथांना जगदंबा दर्शनकपटाची बंधने सुटतील शत्रूचा पराभव होईल मानसन्मान मिळेल
पाचवामच्छिंद्रनाथांचा पिशाच्च वर स्पर्श शास्त्राचा प्रयोगघर बाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही
सहावामच्छिंद्रनाथ व कालिका माता युद्धशत्रूचे हृदय पाटील मनातील कपड दूर होईल व मित्रता वाढेल
सातवामच्छिंद्रनाथ व वीरभद्र युद्ध84 लाख योनी मिळणार नाही व्यथा चिंता संपेल
आठवापशुपतांना श्रीरामाचे दर्शन दूरदेशी गेलेल्या मित्राची परिवाराची काळजी संपेल
नववागोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील
दहावागोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने चिखलाचा पुतळा सजीव केलात्रिदोष होणार नाही. मन सात्विक होईल मुले जगतील
अकरावाजालिंदरनाथांचा जन्मअग्निपिडा दूर होईल गृहदोष जाईल संततीची प्राप्ती होईल
बारावाकानिफनाथांचा जन्मदेवता प्रसन्न होऊन अनुग्रह देती
तेरावामुंग्याने मैनावतीची मांडी कोरलीस्त्रीहत्या दोष संपेल. पूर्वजांचा उद्धार होईल
14 वामैनावतीचा गोपीचंद ला उपदेशकारागृहातून सुटका होईल निर्दोष मुक्तता मिळेल
पंधरावाकानिफनाथ व मारुती यांची भेटघरातील भांडणे थांबून सुख शांती लाभल
 सोळावागोरक्षनाथांनी अस्त्रांचा प्रयोग करून फळे पाडलीवाईट स्वप्नांचा नाश होईल
सतरावागोपीचंद राजाला नाथ दीक्षायोगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल
अठरावागोपीचंद यांचे अश्व शाळेत भोजनब्रह्म हत्येचा दोष संपेल नरकातून पितरांचा उद्धार होईल
१९कलिंग विषय सह गोरक्षनाथ सारथी म्हणून स्त्री राज्याकडे निघालेपरमानंददायी मोक्ष मार्ग लाभेल
२० वाचलो मच्छिंद्र गोरक्ष आयामन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल
21गोरक्ष मच्छिंद्रनाथ व मीननाथ यांची तीर्थयात्रा
२२ वामीननाथाला दगडावर आपटून धुतलेज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल
23 वागोरक्षनाथांनी पर्वत सोन्याचा केलाघरातील सुवर्ण टिकून राहील
24 वाभरतरीने हरणीचे संगोपन केलेबालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील
२५ वासुलोचना गर्भ देहप्राप्तीशॉप लागणार नाही मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभतील
26 वाराक्षसधारी चित्र वर्मा गंधर्वाचा वध व स्वर्ग रोहनगोहत्तेचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत
27 वादत्तात्रय आणि तहानलेल्या भर तरी साठी आरण्यात सरोवर निर्माण केलाहरवलेली वस्तू मिळेल गेलेले अधिकार प्राप्त होतील
२८ वापिंगला सती गेलीगुणवंत स्त्री शी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल
२९ वागोरक्ष नाथांना मंत्राने असंख्य पिंगला निर्माण केल्याक्षय रोग ब्रा होऊन त्रिविध ताप संपेल
३० वाउधळीतील पाण्याचा पुत्र बनवलाचोरांची दृष्टि नाहीशी होईल
३१ वाचामुंडा देवता रोज चौरंगी पुढे फळे ठेवीतशाबरी मंत्राचे कपट आपल्यावर होणार नाही
३२ वारेवतीने नाथ देवतांचे तुकडे करविलेगंडांतरे संपतील
३३ वागोरक्षनाथांनी मिनीनाथाकडे अन्न दीक्षा व पाणी मागितले .धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल
३४ वागोरक्षनाथांनी संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केलेसर्व कर्म सिद्ध होऊन जीवन सफल होईल
३५ वाब्राह्माणाला वटवृक्षाच्या पोकळीत बालक मिळालेमहासिद्ध प्राप्त होऊन ४२ पिढ्यांचा उद्धार होईल
३६ वारेवणनाथ व भगवान शंकर यांचे युद्धसाप विंचू दंश बरा होईल
३७ वानागनाथांनी हजारो तक्षक निर्माण केलेदूषितपणा दूर होऊन विद्या प्राप्त होईल
३८ वानारदांनी चर्पटीला सत्यश्रवाच्या स्वाधीन केलेहिव ताप ,नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील .
३९ वाचर्पटी नाथ व भगवान विष्णूचे युद्धयुद्धात विजय प्राप्त होईल
४० वासर्व नाथ विमानातून अमरावतीस गेलेकाम धेनु प्रमाणे सर्व इच्या पूर्ण होतील .व सर्व नवनाथ परायणाचे फळ लाभेल .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment