navnath bhaktisar adhyay 12
जालिंदरला त्याच्या जन्माची सर्व कथा अग्नीने सांगितली. मग अग्नि म्हणाला ,” बाळा तुझी काय इच्छा आहे? ते सांग.” ती मी पूर्ण करतो. तेव्हा जालिंदर म्हणाला,”अग्नी देवा खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही पण आता हा जो मनुष्यदेह मी धारण केला आहे. त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे ही विनंती. नाहीतर कित्येक जन्मात आणि मरणात तसे माझे होऊ नये.” त्याचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला.
त्यांनी अरण्यातील रूप आवरून घेतले आणि देव जालिंदरला आपल्या खांद्यावर घेऊन दत्तात्रय यांच्याकडे गेला. त्यांना पाहून श्री दत्तगुरु म्हणाले,” अग्नी देवा आज अचानक मजवर ही मोठी कृपा केली म्हणायची, आणि हा बरोबर कोण आहे ? तरी तुमचे स्वागत असो. “अग्नि म्हणाला,” हा जालिंदर नावाने अवतरलेला अंतरिक्ष ऋषी आहे. मदन दहन झाले तरी मदन माझ्या ठिकाणी शिवतेजानीयुक्त झालेला तसाच सूक्ष्मरूपाने राहिला होता. बृहद्रवा राजा सोम्या करीत असता तेथेच मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषीच्या जीवांसह बाहेर टाकले. तुझा बालक उपनयन झाल्यावर तू राजाकडून पळून आणण्यात गेला तेथे माझी व त्याची पुनर्भेट झाली. त्याला जगात सर्वत्र चिरंतर कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे. म्हणून मी त्याला आपल्या पायांशी आणले आहेत.”
navnath bhaktisar adhyay 12 अनुसार दत्तगुरु म्हणाले,” वा! फार उत्तम मी त्याला सर्व विद्यासंपन्न करीन. बारा वर्षे त्यांनी माझ्याजवळ राहिले पाहिजे.राहशील का?” नंतर या दोघांनी त्याला मान्यता दिली. अग्नी देवाने निरोप घेतला व तो अदृश्य झाला. जालिंदर दत्ता जवळ राहू लागला. दत्तानी जालिंदरला अद्वैताचा बोध केला आणि त्यांनी आपल्याबरोबरच ठेवले. सकाळी बागारीत स्नान करावे विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे मग कोल्हापुरात भिक्षा मागावी< पांचाळेश्वर भोजन करावे व माहुर गडावर रेणुका मातेच्या माता पुरीत रात्री विश्रांती घ्यावी.असा श्री दत्तात्रयाचा दिनक्रम.
विष्णुपुराणातील समुद्रमंथन ची गोष्ट वाचण्यासाठी
| येथे क्लिक करा |
त्यांच्या इंद्रसही त्यांनी बरोबर घेतले आणि बारा वर्षाच्या अवधीत शस्त्रास्त्रे, वेदशास्त्र, विद्या, कला यांचे संपूर्ण ज्ञान अशा रीतीने विद्यार्थीसंपन्न झाल्यावर त्यांनी सर्व दैवतांचे दर्शन घेतले.त्यांना सर्व दैवताकडून वरदान भेटले. एवढे झाल्यावर त्यांनी अग्नीला बोलून म्हणाले,” हा तुझा पुत्र जालिंदर! आता याला सर्व विद्या नियुक्त केले आहे.”अग्नीला हे ऐकून संतोष झाला मग त्यांनी जालिंदरला घेऊन पूर्वीच्या प्रमाणे मच्छिंद्र आणि सर्व देवता प्रसन्न करून घेतल्या होत्या त्याचप्रमाणे त्याला वश करून घेतले .
पुढे अग्नीने त्याला बारा वर्षे बद्रिकाश्रमी तप करण्यास नेले. तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू , महेश बद्रीनाथ यांनी त्यांच्या तपाचे परिपूर्ती झाल्याचे सांगितले व त्यांना संपूर्ण सिद्ध केले. मग अग्नी व जालिंदरनाथ यांना बद्रीनाथांनी एक कथा सांगितली.
navnath bhaktisar adhyay 12 नुसार भगवान शिव त्यांना म्हणाले,” पूर्वी एकदा ब्राह्मणाचे तेज स्कलित झाले व तेव्हा हिमालयात एक दिग्गज गज निद्रिस्त होता. त्याच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य देह धारण केला. जालिंदर त्याला तू बाहेर काढ. कानातून जन्मल्यामुळे त्याला “कानिफनाथ “असे म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर आणि त्याला आपल्यासारखाच कर. शिवाचे बोलणे ऐकून जालंदर व अग्नी त्याला म्हणाले,” तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे पण तो गज आम्हाला दाखवा”. तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले . त्यांना तो गज दुरूनच दिसला. तो इकडे तिकडे संचार करीत होता, शंकर म्हणाले.
हा दिग्गज मोठा भयंकर आहे व चंचल ही आहे असे वर्णन navnath bhaktisar adhyay 12 मध्ये आले आहे . तेव्हा जालिंदराने दुरूनच त्या महागजावर मोहन अस्त्र व स्पर्शास्त्र टाकले . त्या दोन्ही अस्त्राचा परिणाम होऊन तो हत्ती तात्काळ भूमीला खिळला आणि मुकाट्याने एका जागी उभा राहिला. जालिंदर , अग्नि , शंकर संथपणे त्याची जवळ गेले. जालिंदर याने हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारल्या , ”अरे कानफा”, अरे प्रबुद्ध नारायणा , अरे ब्रह्म सुता दीक्षा देव धारण करून तू या दिग्गजांच्या कानात येऊन राहिला आहेस ना ? तू बाहेर ये अग्नीदेव महादेव व मी अंतरिक्ष तुला जालिंदर रूपाने बोलवीत आहे. तुझी कार्य तुझी वाट पाहत आहे , ये लवकर बाहेर ये.
त्याच्या हाक ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून सोळा वर्षाचा एक तेजपुंज तपस्वी तरुण डोकावून पाहू लागला . त्याला भगवान शंकर , अग्नि व जालिंदर हे तिघे दिसले. तेव्हा त्यांना तिथूनच हात जोडून त्यांनी नमस्कार केला. मग जालिंदर यांनी उंच हात करून त्याला खाली उतरून घेतले.
navnath bhaktisar adhyay 12 प्रमाणे कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना प्रणाम केला . भगवान शंकर जालिंदराला म्हणाले , अग्नी पुत्र . या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे . अग्निनेही शंकराच्या म्हणण्याला मान्यता दिली . तेव्हा जालिंदराने कानिफनाथच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला .
तात्काळ कानिफनाथांच्या मनावरील अज्ञान पटलं दूर होऊन , अद्वैत भ्र्ह्मा चा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अस्ट्स्तविक भाव प्रकट झाले . त्यानंतर भगवान शंकर , अग्नी , जालिंदर व कानिफ असे चवघेही बद्रिकाश्रमात आले व अग्नी जालिंदराला म्हणाला , अरे श्री दत्तात्रेयांनी जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफाला करून दे ! त्याप्रमाणे करण्याचे वाचन जालिंदराने दिले .तेव्हा अग्नी गुप्त झाला .पण बद्रीनाथ शंकर मात्र सहा महिने व्यक्त राहून कानिफाला दत्त प्रणित सर्व विद्या दान जालिंदराकडून होते कि नाही ते पाहत होते . जालिंदराने कानिफनाला सर्व अस्त्रे दिली .अशी नोंद navnath bhaktisar adhyay 12 मध्ये आली आहे .
पण संजीवनी विद्या व मंत्र मात्र शिकवलं नाही .त्याचा कानिफावर काही पूर्ण विश्वास बसत नव्हता . त्या विद्यांचे पालन कानिफ नीट करेल कि नाही असे त्याला वाटले .मग भगवान शंकर त्याला म्हणाले ,अरे जालिंदरा ,” अस्त्र विद्यांची सर्व देवता कानिफाला प्रसन्न करून दे .”तेव्हा जालिंदराने सप्त लोक आणि सप्त पातळ यातील सर्व डेटतांना आवाहन केले , सर्व देवता आल्या
.त्यांनी कानिफाला सर्व वरदान दिली , इतकेच नव्हे तर जालिंदराने जेव्हा त्यांना शाबरी विद्यासाठी साहाय्य करण्यास सांगितले .तेव्हा तेही त्यांनी आनंदाने मान्य केले . त्यानंरत आपल्या आपल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या स्थानास गेल्या . हरी , हार , जालिंदर व कानिफ असे चारी जण बद्रिकाश्रमात तीन दिवस राहिले . अशी navnath bhaktisar adhyay 12 कथा सारांश संपला .