Navnath bhaktisar adhyay 13 श्री नवनाथ कथा सारांश अध्याय १३ । Mainavatis great devotion to his Guru

Navnath bhaktisar adhyay 13 मध्ये आपण महाराणी मैनवाती आणि श्री जलिंदर नाथ यांची भेट आणि दिक्षा कथा सारांश पाहणार आहोत.

हरिहरच्या सांगण्यावरून कानिफ व जालिंदर बारा वर्षे बद्रिका आश्रमात राहिले. 40 कोटी 20 लाख मंत्र त्यांनी रचले. मार्तंड पर्वतावर जाऊन सूर्यकुंडातील जलसिंचन करून सर्वदैवते व सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले. मग जालिंदर याने कानिफला गंगातीरी बारा वर्षापर्यंत कठोर तप करण्यासाठी बसवल. बद्रीनाथाच्या साक्षीने कानिफाचे तप पूर्ण झाले आणि जालंदर तीर्थयात्रेला निघाला.

जालिंदर अनेक देशात गेला कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन मग गावात शिरायचे. गाईंना ते गवत खायला घालायचे असा जालिंदरने परिपाठ ठेवला होता. ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायु ल सांगून जालिंदराच्या डोक्याला सीन होऊ नये म्हणून गवताचा वारा अधांतरी तरंगत ठेवला असा उल्लेख navnath bhaktisar adhyay 13 मध्ये आला आहे .

पुढे गौड देशात हेलापटन या गावात शिरताना जालिंदर आणि डोक्यावरील भारा आणला होता तो आधांतरच तरंगताना पाहून लोक त्याच्याकडे बोटे दाखवून बोलू लागले,”हा कुणीतरी मोठा योगी दिसतो!”मग लोक जास्तच त्याच्या मागे लागले. तेव्हा जालिंदर गावोगावी साधेपणाने कुठेतरी पडून राहू लागला. त्यांनी आपली विद्या आणि योग सामर्थ्य कधी कोणाच्या प्रत्ययाला येणार नाही. अशा रीतीने दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे असे वागणे चालविले.

गौड देशाचा राजा मोठा सुंदर होता. त्याचे नाव गोपीचंद तो मोठा शूर सद्गुनी व अफाट सैन्य वेळ असलेला होता. तो पराक्रमी ही होता. सोळाशे सुंदर स्त्रियांचा होत विलासाने जीवन घालवीत होता. त्याची आई महिना होती ही मोठी साध्वी होती. तिला राजा फार मान देत असे. जालंदर हेलापटनातील रस्त्याने जात असताना. त्याच्या डोक्यावर गवताचा भारा होता तो अधांतरी होता.

navnath bhaktisar adhyay 13 नुसार जालंदर दिसायला अग्नीसारखा तेजस्वी होता. त्याने कितीही साधे राहून तेज लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नव्हते. मैनावती राजपसादाच्या सज्जात उभी होती. तिच्यासमोरच राजरस्ता होता. जालिंदर तिथून जात असताना तो तिच्या दृष्टीस पडला. तिला फार आश्चर्य वाटले,”कोण हा? एवढा तेजस्वी योगी?”कोणाशील हा याच्या डोक्यावर गवताचा  भारा अधांतरी हात सुद्धा न लावता कसा राहिला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले जालिंदर संतपणे सरळ दृष्टी ठेवून चालला होता. मनवतीने आपल्या एका ज्येष्ठ आणि सुज्ञ दासीला बोलाविले आणि तिला तो अजून तरी गवताचं भारा घेऊन चाललेला योगी दाखवला.

दासी चितूर होती तिने काय ते ओळखले. ती म्हणावे तिच्या कानात कुजबुजली,”मोठ्या राणी महाराज, हा खरोखरच कोणीतरी महात्मा आहे, मनावतीने तिला हलकेच सांगितले”तू कोण कुठे राहतो त्याचा तपास कर, मैनावतीच्या सूचनेप्रमाणे दासी गुप्तपणे प्रसादाबाहेर पडली व जालिंदराचा पाठलाग करू लागली. तो आपल्या स्तंभारीत चालत होता. वाटेत गाईंचा कळप त्याला दिसला.

त्याने त्या गाईंना गवत खायला घातले. मग तो तडक गल्ल्या मागून कल्याण ओलांडीत पुढे निघाला आणि एका ओसाड जागी जाऊन निवांत बसला. दासीने गुप्तपणे जाऊन तो प्रकार पाहिला व परत येऊन महिना व तिला सर्व हकीगत सांगितली.

मैनावती तिला म्हणाली,”रात्री सर्वत्र सॅमसंग झाले की आपण दोघी कोणाच्या नकळत त्याच्याकडे जाऊ,”ते बोलणे तितकेच थांबले रात्र झाली. राजप्रसादात सर्वत्र निजाणीच झाली. द्वारपाडा शिवाय कोणी जागे नव्हते. मनावतीने एका तबकात फळे आणि शद्रस अन्न घेतले.

दासीला बोलावले, काळया कांबळी दोघींनी पांगरल्या मग राजप्रसादातून बाहेर पडून तेथे जालिंदर होता तिथे त्या गेल्या. त्यांनी पटकन पुढे जाऊन जालिंदराच्या पायावर मस्तक ठेवले. मैनावतीने तबकावरचे आवरण काढून ते तबक त्याच्या पुढे ठेवले. जालिंदर ने मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले.

 जालिंदरनाथ जन्म कथा          वाचण्यासाठी  

      येथे क्लिक करा  

navnath bhaktisar adhyay 13 मध्ये पुढे त्यांचा मार खाऊनही मैनावति  जागची हल्ली नाही. तिचे धैर्य पाहून मग मात्र त्यांनी विचारले,”तुम्ही कोण? माझ्यासारख्या वेड्याच्या मागे का लागलात?” मैनावती म्हणाली, महाराज मला जीवन नकोसे झाले आहे, मला मोक्ष हवा माझे पती तिलोचन महाराज कालवत झाले. मला वैधव्यातले जीने नकोसे झाले आहे.

या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला सोडवा! जालिंदर म्हणाला,”पण तू कोण?”मैनावती म्हणाली” या वंग देशाचा राजा गोपीचंद याची मी आई. ही माझी दासी.”तेव्हा जालिंदर म्हणाला,” राजमाते , या अपरात्री तू इथे सापडलीस तर तुझी व राजाची किती दुशकीर्ती होईल?”.

तू तात्काळ येथून परत जा तू माझ्या मागे लागू नकोस. जन्म मरण व प्रारब्ध कोणाला चुकले आहे का? मैनावती घाबरून म्हणाली,”योगीराज, तुम्ही मोक्ष दाते. तुम्ही माझा अवेअर करू नका. मैनावती तबकातील पदार्थ अर्पण करून परत गेली.

त्यानंतर रोज रात्री दासीसह तिच्याकडे येऊन त्याचे पाय चेपणे वगैरे अशी सेवा ती करू लागली.

वृद्धावस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू, लोकोत्तर धैर्याची स्त्री होती. तिने सहा महिन्यापर्यंत जालिंदराची सेवा केली. तरी त्यांनी तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. एका रात्री तिने स्वामींचे मस्तच आपल्या मांडीवर घेतले होते व ते निद्रित झाले होते.

स्वामी आपल्याला योग दीक्षा केव्हा देतील याच गोष्टीची चिंता महिना व तिला लागली होती. त्यावेळी जालिंदरला वाटले याची परीक्षा घ्यावी. त्यांनी निद्रित असतानाच माया शक्तीने एक भुंगा उत्पन्न केला. तो तिच्या मांडीला दंश करू लागला.

त्याने मांडी पोखरलीच. भळाभळा रक्त होऊ लागले. पण मनावरती गप्पा बसून राहिली. मग जागे झाल्यासारखे करून जालिंदराने सर्व प्रकार पाहिला. तिच्यावर प्रसन्न होऊन कृपादृष्टीने तीच कडे पाहिले

अद्वैत ब्रह्मसिद्धी व संजीवनी प्राप्त करून देणारी योग दीक्षा तिला दिली. तिच्या मांडीला पडलेले क्षत बरे केले.

मंत्र उपदेश देताच महिना व तिला आदळत्याचा साक्षात्कार होऊन तिची साधना लागली. मग ती त्याच्याच कृपेने पुन्हा भानावर आली. ति च्या मनात विचार आला. महात्मा जालिंदरनाथ यांनी मला चिरंजीव केले. पण भोगात मग्न झालेला माझा मुलगा गोपीचंद याचा जर हे नात असाच उद्धार करतील तर? त्याच्यासाठी आपण नाथांना विनंती करावी. अशी हि navnath bhaktisar adhyay 13 ची सारांश कथा समाप्त होते .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment