navnath bhaktisar adhyay 2 नवनाथ भक्तिसार कथा अध्याय २ सारांश

navnath bhaktisar adhyay 2 श्री शंकर आणि श्री दत्तात्रय

मंदारचलाची शोभा , तसेच बदरिका वनाचे सौंदर्य बघत चालले होते .वनात चालत असताना त्यांना वाटे मध्ये  एक मुलगा ध्यानस्त दिसला.अर्थातच तो मच्छिन्द्रनाथ होता.

त्याची अस्थिपंजर अवस्था बघून लांबूनच भगवान शंकर श्री दत्तांना  म्हणाले “हा मुलगा खूप क्षीण झाल्यासारखा दिसत आहे.मी इथेच थांबतो तुम्ही पुढे जाऊन त्याच्या तपाचा काय हेतू आहे ते विचारा.”श्री दत्तात्रय त्या वृक्षाकडे हळूहळू चालत गेले असता त्यांच्याभोवती दिव्य प्रकाश पडला.

त्यांनी मच्छिन्द्राजवळ जाऊन विचारले “हे तरुणा एवढे कठीण तप कशासाठी करत आहेस.”त्यांची वाणी कानावर पडताच मच्छिन्द्रने मोट्या कष्टाने  आपले डोळे उघडले.

समोर श्री दत्तात्रयाचे दर्शन होताच मच्छिन्द्रनाथनी बसल्या जागेवरूनच त्यांना वंदन केले आणि म्हणाले गुरुदेव मला या दाट बदरिकेच्या  वनामध्ये तप करताना बारा वर्षांमध्ये कोणीही मनुष्यप्राणी आजपर्यंत दिसून आला नाही,आपले दर्शन झाले ही त्या अंबाबाईची कृपाच म्हणावी लागेल.आता आपला कृपाप्रसाद देऊनच जावे!”

श्री गुरुदत्त बोलले “मी अत्रिसुत दत्त आहे.तू हे घोर तप का करत आहेस?”त्यावर मच्छिन्द्र आदराने म्हणाला “गुरुदेव!तुम्ही मला दर्शन देऊन माझे तप फळाला आणले.मी धन्य झालो .”असे बोलून त्याने स्वतःला भगवान दत्ताच्या चरणी नतमस्तक केले.

“श्री दत्तांनी त्याला आपल्या दिव्य बाहुंमध्ये सामावून घेतले.तेव्हा भक्तिभावाने भरून जात तो म्हणाला,”हे परमेश्वरा,मी ईश्वरप्राप्तीसाठी हे तप करत आहे.तुम्ही तर ब्रम्हा,विष्णू,महेश यांचे सर्वसाक्षी सर्वज्ञ देव!माझा एवढा काय गुन्हा झाला की माझी बारा वर्षे उपेक्षा केली”श्री दत्तात्रेनी  सांत्वन करीत मच्छिन्द्रचे पाणावलेले डोळे पुसले त्याला आपल्या इच्छेने सुदृढ केले.

मच्छिन्द्र पाया पडला.गुरुदत्तानी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला उपदेश केला.उपदेश करताच मच्छिन्द्रची माया,भेदबुद्धी नष्ट झालीव navnath bhaktisar adhyay 2 नुसार त्याला सर्वत्र एकच परम चैतन्य दिसत होते.यावर दत्तात्रय त्याला म्हणाले, असा सुखद अनुभव तुला नेहमीच होईल.चल भानावर ये!तुला  भेटायला साक्षात भगवान शंकर आले आहेत.

हे ऐकताच मच्छिन्द्र आश्चर्यचकित झाला.दोघे श्रीशंकराजवळ आले.श्री शंकरांनी मच्छिन्द्रला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेची आठवण करून दिली.दत्तोत्रय यांनी याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे असे सांगितले.

मच्छिन्द्रवर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले आणि पंचमहाभूतांवर अधिकार दिला.’नाथ’ हे नाव,परंपरा चालविण्याचे,कां विंधण्याचे संस्कार,मच्छिन्द्र हे स्वतःचे नाम,संप्रदायाची शृंगी,शक्ती एकवटीची,दीक्षेचे सर्व सामर्थ्य मच्छिन्द्रला देऊन सहा महिन्यांनी श्री दत्त आणि श्री शंकर निघून गेले.मछिंद्रही दक्षिणेकडे निघाला.

पुढे तो फिरता फिरता आंबाबाईच जागृत देवस्थान असलेलं ठिकाण सप्तशृंगी येथे पोहचला.तेथे अंबेचे स्तवन करता करता त्याच्या मनात विचार आला कि लोकांना संकटात उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र्य रचून ठेवावे.

कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील?असा विचार करता करता देवीने आपल्याला दर्शन द्यावे,म्हणून मच्छिन्द्रने सात दिवसांचे अनुष्ठान मांडले.ते पूर्ण होताच अंबेने प्रसन्न होऊन दर्शन दिले.देवी त्याला म्हणाली,”बाळा!तुला जे हवं आहे ती शाबरी विद्या होय.तुझ्यावर श्री दत्तात्रय यांनी कृपा केली आहे.त्यामुळे तुला मी सांगेल ते साध्य होईल,तसेच सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील,तू माझ्यासोबत चल.

सप्तशृंगी  देवीने मच्छिन्द्रांना मार्तंड पर्वतावर नेले. तेथे नाग-अश्वत्थ नावाच एक  होते. बीजमंत्रांनी हवन करून मच्छिन्द्रना तो दिसला.पाहतो तर त्या वृक्षावर बाव्वान वीर बारा मातृका सूर्य आणि सर्व देवता सर्व शस्त्र अस्त्र देवता झाडाच्या सर्व फांद्यांवर बसल्या होत्या .

पण त्या काही मच्छिन्द्रनाथांशी बोलत नव्हत्या.ते पाहून देवी म्हणाली मच्छिन्द्र तुला ह्या सर्व देवता प्रसन्न होतील व तुला विद्यामंत्र देखील देतील पण त्या साठी तुला एक काम करावे लागेल येथून तू ब्राह्मगिरी पर्वतावर जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून एक नदी  दक्षिण दिशेला वाहते . त्या नदीच्या पात्रामध्ये हत्तीच्या पावलांएवढे कुंड आहेत .पंढरीच्या वेली  हातात घे आणि एकेक कुंडामध्ये वेलं टाक परत येताना त्या वेली  पहा आणि ज्या कुंडामध्ये वेळी सजीव राहिलेली दिसेल त्या कुंड मध्ये तू स्नान कर तसेच त्या कुंडातील पाणी सोबत काचपात्रामध्ये घे .

पण एक सांगते त्या पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे तुला चक्कर येईल .तरी त्या अवस्ते मध्ये तू आदित्यचे १२ नावांचे स्मरण कर पण त्यांचा जप कर असे केल्याने तुला काही त्रास होणार नाही .तू शुद्धी वर येशील येथे परत येऊन तू ते सोबत आणलेले पाणी या वृक्षावर शिंपड असे केल्याने तुला त्या झाडावरील एक देवता प्रस्सन होईल व तुला ज्ञान देईल .अशा उल्लेख navnath bhaktisar adhyay 2 या कुठे मध्ये आहे

एका वेळी एकच देवता प्रस्सन झाली तरी तू न थकता न कंटाळता अशा खेपा घालत राहा असे करून तुला त्या झाडावरील सर्व देवता प्रसन्न  होऊन तुला वरदान देतील .असे सांगून देवी तेथून निघून गेली .

मछिंद पंढरीच्या वेळी घेऊन निघाला .देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले .एक कुंडातील वेल सजिव  राहिली मग मच्छिन्द्रनाथांनी  त्या कुंडामधील पाण्याने स्नान केले .असे केल्याने लागलीच  त्याला मूर्च्छा आली ,नंतर तो आदित्यचे बारा नाव स्मरू लागला .तेव्हा सर्व देव त्याच्या समोर आले वर त्याला आशीर्वाद देऊन पुन्हा जागे केले .

मग त्यातील पाणी घेऊन मछिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य झाडावर ते सोबत आणलेले पाणी शिंपडले .त्याच बरोबर त्या वृक्षावरील सूर्य देवता बोलू लागली व त्याला वरदान दिले कि जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मीप्रगट  होईल .

navnath bhaktisar adhyay 2  नुसार अश्या रीतीने मछिंद्र सात महिने न थकता त्या शंभर कुंडांच्या प्रदक्षिणा  करत राहिला व सर्व देवता प्रसन्न होऊन त्यांनी मच्छिन्द्रला सर्व विद्या दिल्या . त्या नुसार त्याने शाबरी विद्या नावाने मोठा ग्रंथ रचला ,त्याची इछा पूर्ण झाली ,त्या नंतर मच्छिन्द्रनाथ बंगाल देशाकडे निघाला .

तीर्थ यात्रा करत असताना मछिंद्र एका गावातील घरा समोर उभे राहून अलख निरंगन अशी आरोळी दिली वर भिक्षा मागितली घराची मालकीण सरस्वती  भिक्षा वाढायला बाहेत आली पण तिचा चेहरा दुःखी दिसला .त्यावर मच्छिन्द्रनाथांनी विचारले,”माई,आपण दुःखी का?”त्याचे वाक्य ऐकताच  सरस्वतीने तिची यातना नाथांपुढे मांडली.

ती बोलली “महाराज देवाच्या कृपेने सर्व काही आहे कशाचीही कमी नाही पण पुत्र संतान नाही.”तिची व्यथा ऐकून मच्छिन्द्रनाथ म्हणाले,”माई,त्यावर एक उपाय आहे.हे  भस्म अंगारा आहे.हे घ्या आणि देवाची मनापासून प्रार्थना करून हे आपण खाऊन त्यावर पाणी प्राशन करावे.हे घेतल्यानंतर हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी जन्म घेतील.

त्याचे पालनपोषण करत असताना मी बारा वर्षांनी येईल.त्याला दिव्य ज्ञान देण्यासाठी माझ्यासमवेत घेऊन जाईल.”असे बोलून मच्छिन्द्रनाथ तिथून निघून गेले.

सरस्वतीबाईंना प्रचंड आनंद झाला.या आनंदाच्या भरात झालेला सर्व वृत्तांत तिने आपल्या शेजारणीला सांगितलं.त्यावर ती शेजारीण बाई तिला म्हणाली,”अहो,असा अंगारा खाऊन कुठे मुले होतात का?असे हे जादू-टोणा करणारे लोक खूप लबाड असतात.त्यांच्या नादी नका लागू.

तिचे असा प्रकारचे बोलणे ऐकून सरस्वती खूप घाबरली.तिने तो अंगारा अंगणात गाईचे शेण,राख,कचरा टाकण्याच्या जागी फेकून दिला.थोड्याच दिवसात तिला या गोष्टीचा विसर पडला. navnath bhaktisar adhyay 2

नवनाथ ग्रंथ याच्या ४० अध्यायाची फलश्रुती जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा . तसेच या navnath bhaktisar adhyay 2 या कथेचा विडिओ पाहण्यासाठी विडिओ नावाच्या लिंक वर क्लिक करा .

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment