Podcast ek navin vyavsay च्या माध्यमातून कमाई चा नवीन मार्ग
जीवनामध्ये प्रत्येकाला आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असे नेहमी वाटत असते. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे बऱ्याच जणाला पटत नाही. स्वतःच्या हिमतीवर स्वतः व्यवसाय करण्याचा प्रयत्न पण त्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य सल्ला मिळत नसल्यामुळे ते या गोष्टीपासून दूर जाऊन कुठेतरी छोट्या-मोठ्या पगाराची नोकरी बघून आपलं आयुष्य असंच जगत असतात.
म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अशी एक बिझनेस आयडिया ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीची गरज देखील भागणार नाही व आपल्याला कुठेही दुकान बनवण्याची गरज पडणार नाही.
आपल्याला हवे त्या ठिकाणावरून आणि हवे त्या वेळेमध्ये काम करण्याची सोय या व्यवसायामध्ये असणार आहे. तसेच या व्यवसायासाठी आपल्याला कुठलीही टीम सुरुवातीला बनवण्याची गरज नाही आपण स्वतः सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो.
या व्यवसायासाठी आपल्याला एक लॅपटॉप असणे आवश्यक आहे कारण यामध्ये सर्व कामे ही आपल्याला ऑनलाइन करावी लागणार आहेत म्हणून एक घरगुती संगणक किंवा लॅपटॉप व एक चांगले इंटरनेटचे कनेक्शन असेल तरी चालते.
या Podcast ek navin vyavsay आपण महिन्याकाठी लाखभर रुपयांची कमाई देखील करू शकता.
आता आपण पाहू हा व्यवसाय नेमका कुठला?
हा व्यवसाय नवीन दुसरा तिसरा कुठला नसून आपण स्वतः पॉडकास्ट तयार करणे हा आहे.
आता पाहू पोडकास्ट म्हणजे काय?
जुन्या काळी जेव्हा टीव्ही हा भारतामध्ये नवीन आला होता तेव्हा भारतातील लोक हे माहितीसाठी किंवा विरंगुळ्यासाठी रेडिओ या साधनाचा उपयोग करायचे. चार लोक एकत्र येऊन ते रेडिओ वरती देशातल्या सर्व गोष्टींची माहिती घ्यायचे.
त्याकाळी रेडिओवर समाजातील मोठ्या व्यक्ती मुलाखती असायच्या. जसजसे व्हिडिओ व्हिडिओद्वारे माहिती प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली व टीव्ही हे यंत्र सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा रेडिओ ही संकल्पना मागे पडत गेली.
पण म्हणतात ना, जुने ते सोने असते या म्हणीप्रमाणे आपण समाजामध्ये पाहतो की जुन्या गोष्टी खूप काळ गेल्यानंतर त्या परत नवीन असल्या सारख्या भासतात व तोच जुना ट्रेंड परत येत असतो.
तसेच या टीव्हीची कथा होत आहे, आधीच्या काळी घरामध्ये टीव्ही असणे हा मोठ्या लोकांचा विषय असायचा पण आता टीव्ही इतका कॉमन झाला आहे की त्याला पाहत देखील नाही.
आता परत जुना फ्रेंड येऊन लोक माहिती पाहण्याऐवजी माहिती ऐकणे पसंत करत आहेत, हाच तो प्रकार आहे पॉडकासचा ज्यामध्ये आपण वेगवेगळी माहिती, मुलाखती, गोष्टी इत्यादी ऐकू शकतो .
कुठे चालतात हे Podcast ek navin vyavsay ?
ज्याप्रमाणे युट्युब फेसबुक इंस्टाग्राम असे अनेक सोशल मीडिया ही माध्यमिक आहेत त्यामुळे आपण व्हिडिओ तसेच ऑडिओ कंटेंट पाहू शकतो तसेच पॉडकास्ट हा एक ऑनलाईन ऑडिओ यांचा संग्रह असलेला प्लॅटफॉर्म आहे. जेथे तुम्ही तुमच्या आवडीचा ऑडिओ पाहिजे ऐकू शकता.
जर तुमचे वक्तृत्व चांगले असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा कविता, मोटिवेशनल स्पीच इत्यादी रेकॉर्ड करून त्या तुम्ही ऑनलाईन लोकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकता.
तसेच तुम्ही रोजच्या रोज लोकांना तुमच्या पॉडकास्ट द्वारे बातम्या देखील ऐकू शकता. असे केल्याने तुमच्याशी कनेक्ट होणाऱ्या लोकांची संख्या वाढत राहील व तुमचा ऐकणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होईल या गोष्टीचा तुम्हाला पैसे कमावण्यामध्ये फायदा होणार आहे.
google ने देखील या क्षेत्रात इन्टेरेस्ट घेऊन google podcasts नावाचा वेबसाईट प्लॅटफॉर्म च बनवला आहे .
तुम्ही तुमचे ऑडिओ कंटेंट विकून किंवा ते ऑनलाईन प्रदर्शित करून चांगल्या प्रकारची कमाई करू शकता. जसजसे तुमचे फोरकास्ट ऐकणारे लोक वाढत जातील तस तसे तुमचे उत्पन्न देखील वाढत राहील.
विशेष करून विद्यार्थ्यांना या Podcast ek navin vyavsay चा जास्त फायदा होईल असे मला वाटते कारण विद्यार्थ्यांमध्ये नवीन काहीतरी करण्याची उमेद तसेच हिम्मत देखील असते.
मुले आपली शाळा तसेच कॉलेज करून देखील आपल्या स्वतःचे Podcast ek navin vyavsay तयार करू शकतात . विद्यार्थी ज्या विषयाचा अभ्यास करत आहेत त्या विषयासंदर्भात देखील ते podcast तयार करू शकतात. असं केल्याने त्यांची अभ्यासाची तयारी देखील होते व त्यामधून त्यांची कमाई देखील चालू राहते.
Business ideas for women
घर कामातून वेळ मिळाल्यानंतर महिलांना देखील पैसे कमवण्याची संधी या Podcast ek navin vyavsay च्या माध्यमातून मिळू शकते. घरबसल्या वेगवेगळ्या विषयांवर आपले ऑडिओ रेकॉर्ड करून ते podcast च्या माध्यमातून प्रसारित करणे. मराठी मधून घर खर्चासाठी कमाई देखील होऊ शकते.
Business ideas for retired employees
खाजगी किंवा शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते आयुष्यभर कमावलेलं विचारांचे गाठोड लोकांसमोर उलघडून व त्यांना जीवनातील वेगवेगळे किस्से कहाण्या सांगून देखील आरामात घरबसल्या पैसे कमवता येऊ शकतात. रिटायर झालेल्या लोकांकडे पैशाचा फारसा असा तुकडा नसतो, थोडेफार पैसे गुंतवून हे लोक एखादा स्टुडिओ तयार करून तेथे podcast बनवू शकतात व ते प्रसारित करू शकतात.
Online money
जसे की फेसबुक इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम याद्वारे लोक भला मोठा पैसा कमवतात तसाच पैसा या Podcast ek navin vyavsay माध्यमातून कमवता येऊ शकतो. व तसे podcast साठी दिवस हि अनुकूल दिसत आहेत , माहिती ग्रहण करण्याच्या जुन्या पद्धतीकडे लोक वळत आहेत .आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना एकमेकांबरोबर संभाषणाची खूप जास्त कमतरता भासू लागली आहे , अश्या लोकांचा stress लेवल देखील podcast ऐकल्यामुळे कमी होत आहे , असे आढळून येते . जास्त बोलक्या लोकांसाठी तर हि सुवर्ण संधीच म्हणायची ,
Podcast ek navin vyavsay च्या माध्यमातून बोलण्याचा छंद पूर्ण होतो आणि वर कमाई पण होत राहील .
Podcast ek navin vyavsay चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक ?
सुरवातिला तुम्ही Podcast ek navin vyavsay हा घरूनच चालू करा. त्या साठी तुम्हाला लागेल एक शांत अशी खोली जिथे बाहेर चा आवाज येत काम नये .तुमच्या podcast मध्ये जर तुमच्या आवाजाव्यतिरिक्त दुसरे आवाज येत असतील तर ते पॉडकास्ट ऐकणाऱ्यास डिस्टर्ब करतात.
तुमची खोली लहान असेल तरी चालेल ( एक टेबल खुर्ची बसण्याइतकी पण चालेल ). तुम्ही पॉडकास्ट हा मोबाइल मध्ये पण रेकॉर्ड करू शकता . लॅपटॉप आणि माइक असेल तर अति उत्तम , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना आवडणार किंवा आवश्यक असणार असं कन्टेन्ट . सगळी social मीडिया सद्या ह्याच कन्टेन्ट च्या भोवती पळत आहे . तुम्ही पॉडकास्ट साठी अगदी कुठलाही विषय निवडा आणि त्या कामात सातत्य ठेवा तुम्हाला ऐकणारे ऑडियन्स नक्कीच भेटतील .
तुम्ही जर वर्क फ्रॉम होम च्या शोधात असाल तर आधी हा लेख नक्की वाचा .