Satyendranath Tagore अखिल भारताचे पहिले IAS (1863) / FIRST ICS

सत्येन्द्रनाथ यांची प्राथमिक ओळख 

Satyendranath Tagore यांचे कुटुंब

वडील — महर्षी देवेंद्रनाथ टागोर

आई — शारदा देवी

भावंडं –रवींद्र नाथ टागोर (नोबल पुरस्कार विजेता ) , द्विजेंद्रनाथ टागोर , हेमेंद्रनाथ टागोर ,जोतिरिन्दनाथ टागोर ,सौदामिनी देवी टागोर

अपत्य — Satyendranath Tagore त्यांना २ अपत्य होती , सुरेंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी टागोर

 

ते एक उत्तम कवी ,संगीत निर्माता होते , टागोर हे बंगाल प्रांतातले एक मोठे नाव होते व आजही आहे .टागोर घराणे हे बंगाली ब्रह्मन् म्हणून देखील ओळखले जाते .
तसेच त्यांची सामाजिक कामामध्ये विशेष रुची होती . त्यांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेतला तसेच त्यांचं नेतृत्व देखील केलं . त्या काली जो ब्राम्हो समाज नवीनच तयार झाला होता त्या चे हे एक ऍक्टिव्ह सदस्य होते .
कोलकात्याच्या presidency college  मधून त्यांनी डिग्री घेऊन सण १८६३ साली ते भारताचे पहिले ICS आताचे IAS झाले .
भारताचे पहिले राष्ट्रगीत म्हणून ओळख असणारे गाणे “mile sabe bharat santan , ektan gao gaan ” हे देखील त्यांचीच रचना आहे .
या गाण्याचा अर्थ असा होतो कि ये भारत मातेच्या पुत्रांनी सर्व जण एकत्र या आणि एका सूर मध्ये गायन करा .एकसंघ व्हा .

सत्येन्द्रनाथ टागोरांच्या इंग्लंड प्रवास 

१८५९ साली त्यांचे लग्न जनदानदिनी देवी यांच्याशी झाले . त्या नंतर तीन वर्ष नंतर ते लंडन येथे ब्रिटिशासोबत स्पर्धा करण्यासाठी लंडन येथे INDIAN CIVIL SERVICES हि परीक्षा देण्या साठी गेले.
.
त्यातही ती परीक्षा उत्तीर्ण केली व तेथेच त्यांची ट्रेनींग पूर्ण केली ते भारतामध्ये परत आले व त्यांनी  त्यांच्या ics कारकीर्द मुंबई इथून सुरु केली होती ,नंतर त्यांनी असिस्टंट मॅजिस्ट्रेट व अहमदाबाद चे कलेक्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली .
त्या काळी अधिकारी वर्गाचे काम जास्त करून टॅक्स वसूल करणे आणि इंग्रज सरकारचा दबदबा कायम ठेवणे एवढाच असे .त्यांनी त्या कालच्या सिविल सर्विसेस मध्ये ३० वर्ष काम करून सरकार मध्ये आणि नागरिक मध्ये समतोल राखला .
१८९६ साली त्यांनी आपली शेवटची पोस्टिंग महाराष्ट्रा मधील सातारा या जिल्ह्यामध्ये घेतली होती . व तेथेच ते सेवानिवृत्त देखील झाले .
Satyendranath Tagore  यांचे बंगाली साहित्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे , इंडियन सिविल सर्विसेस मुले त्यांना भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असे , वेगवेगळ्या प्रांतामध्ये असताना तेथील भरतील साहित्य ते बंगाली मध्ये अनुवाद करून ठेवायचे
,त्यांनी संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत आणि बंगाली साहित्य मध्ये खूप मोठी भर टाकली आहे .
तुम्हाला जर विष्णुपुराणालीत समुद्र मंथन कथा वाचायची असेल आणि त्यातील चौदा रत्नाचे रहस्य जाणून घ्यायचे असतील तर लाल लिंक वर क्लीक करा 
महाराष्ट्र मध्ये थोर संत तुकाराम महाराज यांचे काव्य देखील Satyendranath Tagore  यांनी बंगाली भाषेत लिहलेले आहे  तसेच महाराष्ट्रातील बाळ गंधर्वांचे लेखन त्यांनी बंगाली मध्ये नेले आहे .त्यांनी बंगाली भाषे मध्ये ऐकून नऊ तर इंग्रजी भाषेत तीन ग्रंथ लिहून ठेवले आहेत .बंगाली साहित्यात या ग्रंथांना विशेष स्थान आहे .
भारताच्या सामाजिक प्रगती मध्ये Satyendranath Tagore यांचा मोठा वाटा आहे . महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणावर त्यांचा त्यांचा भर असे या गोष्टीची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरातून केली होती .
सामाजिक विरोध असताना देखील  त्यांनी त्यांच्या पत्नीलाच इंग्लंड ला घेऊन गेले होते . इंग्लॅन्ड च्या गव्हर्मेंट हाऊस मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या .
ब्राह्मो समाजाचे सदस्य म्हणून Satyendranath Tagore  काम करत असताना त्यांना १९०७ मध्ये आचार्य या धार्मिक संस्थेचे अध्यक्ष पद देण्यात आले .

सत्येन्द्रनाथ यांचे साहित्य 

–सुशीला अँड  बिरसिंहा

–बॉम्बे चित्र

–नावरत्नमाला

–स्त्रिस्वाधीनता

–बौद्धधर्म

–अमर बालकथा ऑफ बॉम्बे प्रभास

–राजा राममोहन राय

–आत्मकथा

–श्रीमत भगवत गीता

वेगवेगळ्या प्रांतातील प्रसिद्ध साहित्य यांचा अभ्यास करून आपल्या मातृ भाषेमध्ये म्हणजे बंगाली मध्ये त्याचे अनुवाद केले व बंगाली साहित्य त्यांनी समृद्ध केले . सामाजिक साहित्य आणि त्याला जोडून धारकीं साहित्य या कडे  त्यांचा काल नक्कीच आपल्या निदर्शनास येतो .

सत्येन्द्रनाथ यांनी पहिला हिंदू मेळा कलकत्ता येथे १८७६ रोजी व सर्व हिंदू एकत्र केले .आणि या मेळ्या साठी त्यांनी स्वतः देशभक्ती गाणे लिहले  . स्त्री सबलीकरणामध्ये त्यांचा मोठा वाट होता पत्नी बरोबर त्यांनी आपल्या बहिणीला देखील बाहेरच्या जगाची ओळख करून दिली व तसे त्यांना स्वातंत्र दिले ,त्याकाळी बंगालमधील महिलानां देखील पर्दा हि पद्धत लागू होती . आपल्या समाजाचा रोष ओढवून त्यांनी हे स्त्री मुक्ती चे पाउल उचलले .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment