tcs bsnl deal worth $2.9 billion चा करार , 100 % फायदा होईल ग्राहकांचा ?

tcs bsnl deal worth $2.9 billion या सरकारी कंपनी चा झाला आहे एक करार . विषय असा कि टाटा ची एक मोठी कंपनी TCS आणि अंबानी यांची कंपनी JIO ह्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत .

सध्या टेलिकॉम क्षेत्रातील झालेल्या मोठ्या बदलामुळे तसेच JIO व इतर टेलिकॉम कंपन्यांनी वाढवलेले रिचार्ज चे दर लक्षात घेता . याच गोष्टीचा फायदा घेऊन कि काई TATA ग्रुप च्या टेलिकॉम सेक्टर मध्ये काम करणाऱ्या TCS कंपनीने भारत सरकारची टेलिकॉम कंपनी BSNL बरोबर जवळ पास १५,०००/- करोड चा करार केला आहे .

या कराराचा मुख्य हेतू हा tcs bsnl deal worth $2.9 billion एकत्र येऊन भारत देशातील एक हजार पेक्ष्या जास्त गावामध्ये BSNL च्या 4G सेवेची स्पीड वाढवण्यासाठी करणार आहे .

एरटेल , वोडाफोन , आयडिया आणि जिओ या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या असून त्यांनी jully २०२४ मध्ये आपल्या सर्व सेवांचे दर जवळपास २५% एवढ्या प्रमाणात वाढवले आहेत . हि वाढ सामान्य ग्राहकांना काही रूचलेली दिसत नाही व तब्बल काही दिवसामध्ये या सर्व कंपन्यांमधील ग्राहकांनी BSNL ची वाट धरून आपले SIM कार्ड या सरकारी कंपनी मध्ये पोर्ट करून घेतले आहेत . याच सुवर्ण संधीचा फायदा TATA TCS घेऊ पाहत आहे , tcs bsnl deal worth $2.9 billion बरोबर जवळपास १५,००० /- कोटींचा करार केला आहे .

BSNL देखील या संधीचा फायदा घेत अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी पूर्ण जोर लावलेला दिसून येत आहे .नव नवीन प्लॅन जाहीर करून आणि आपली 4G सुविधा सुधारण्यासाठी BSNL जमेल ते प्रयत्न करत आहे .

पण हे हि तितकेच खरे आहे कि जिओ ,एरटेल अश्या बड्या कंपनीचे 5G नेटवर्क जवळपास संपूर्ण भारत भरा मध्ये उपलब्ध आहे. याच गोष्टीला तोंड देण्यासाठी BSNL ने TATA TCS या जायन्ट कंपनी बरोबर करार करून आपल्या सुविधांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे .

tcs bsnl deal worth $2.9 billion यांच्या मधील करार नेमका काय आहे ?

आपल्याला माहीतच आहे कि मागील दहा ते पंधरा वर्ष पासून BSNL कंपनी इतर टेलिकॉम कंपनीच्या स्पर्धे मध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे . पंधरा वर्षा आधीचे अच्छे दिन परत आणण्यासाठी BSNL जोमाने कामाला लागले आहे .सरकारने मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये BSNL चे एक लाख नवीन टॉवर उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे व तसेच हे टॉवर चे नेटवर्क उभारण्यासाठी BSNL ने टाटा ग्रुप च्या एक बड्या टेलिकॉम कंपनी ला म्हणजेच TATA TCS ला हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे .

BSNL मुळातच एक सरकारी कंपनी असल्या कारणाने , 4G च्या प्रोजेक्ट साठी ते सर्व संसाधने इथलीच वापरणार आहेत यामुळे सेवा पुरवण्यासाठी त्यांना कमी खर्च येणार असून BSNL चे RECHARGE अजून स्वस्त होण्यास मदत होणार आहे . अश्या परस्तितीमध्ये टेलिकॉम क्षेत्रा मध्ये पुन्हा एकदा स्पर्धा सुरु होऊन या मध्ये ग्राहकांचाच फायदा होईल असे नजीकच्या भविष्यामध्ये वाटते .

JIO मुळे टेलिकॉम क्षेत्रात परत एकदा खळबळ ?

JIO या कंपनीचा जन्म २०१६ ला झाला होता पण त्या आधी एकंदर भारतामध्ये टेलिकॉम ची किंवा इंटरनेट ची काई परस्तिती होती हि आपणाला माहित असेलच .. सर्व काही अगदी SLOW असायचं  साधी काही MB ची फाइल डाउनलोड करायची असती तरी किमान १० मिनटं लागत होती आणि मोठी फाईल असेल तर तासांशिवाय खेळ चालतच नव्हता .

खूप लिमिटेड असा डेटा मिळायचा , महिन्याच्या रिचार्ज बरोबर २ GB डेटा येत असे . प्रत्येक कॉल साठी एक ठराविक रक्कम आकारली जायची . कॉल हे मिनिटावर मोजले जायचे .

tcs bsnl deal worth $2.9 billion

एक रुपयांमध्ये २ मिनिटे कॉल वर बोलता येई . कोणाला घरी बोलवायचं असेल तर लोक फक मिस कॉल करत असत . अश्या परस्तितीमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी अमाप पैसे कमावला होता .

टेलिकॉम क्षेत्रा मध्ये सर्व काही आलबेल चालले असताना अंबानी ग्रुप ने JIO या कंपनीची अधिकृत घोषणा २०१६ मध्ये केली ,या घोषणे सोबतच JIO ने ग्राहकांवर स्वस्त रिचार्ज चा पाऊसच पडला ,

त्या मध्ये त्यांनी JIO टू JIO CALLING फ्री केल्यानंतर इतर कंपन्यांचे ग्राहक देखील JIO ने स्वतःकडे आकृष्ट करून घेतले जागतिक पातळीवर सर्वात स्वस्त इंटरनेट JIO ने २०१६ मधेच केले होते संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रा मध्ये एकट्या JIO कंपनीने क्रांतीच केले असं म्हणावे लागेल.

सर्व सामान्य ग्राहकाच्या हातामध्ये इंटरनेट आले ते JIO मुळेच  लोकांच्या हातामधील स्मार्ट फोन स्मार्ट देखील JIO मुळेच झाला असे म्हणले तरी चालेल असं मला वाटत कारण पाहिजे तेवढं इंटरनेट JIO ने अगदी स्वस्त दरामध्ये तब्बल आठ वर्षासाठी दिलेलं होत .

लोकांना सर्व स्वस्त रिचार्ज ची सवय लावली आणि आता ८ वर्ष झाल्या नंतर त्यांनी २५ % रिचार्ज चे  वाढीची घोषणा केली आहे.  तर आला लोकांनी JIO कंपनीलाच ट्रॉल करत बॉयकॉट करण्याचा ट्रेंड चालवला आहे आणि त्यांचे BSNL वरचे प्रेम ऊतू चालले आहे .

JIO च्या तुलनेत BSNL कितपत टिकेल ?

२०१६ मध्ये JIO टेलिकॉम कंपनीचं मार्केट मध्ये आगमन झाल्या नंतर या क्षेत्रातील बाप म्हणल्याजाणाऱ्या कंपन्यांनी देखील गाशा गुंडाळलेला आपण पाहिलेच आहे .

टाटा डोकोमो , युनिनॉर अश्या कंपन्या अक्षरशः बंद पडल्या तर एरटेल आहि वोडाफोन सारख्या मोठ्या कंपन्यांनी सुद्धा मान टाकली होती , पण कश्याबश्या एकत्र येऊन त्यांनी आज पर्यंत तग धरला होता .

अश्या परस्तितीमध्ये BSNL हे नाव टिकून राहण्याचं एकच कारण म्हणजे हि कंपनी सरकारी आहे म्हणून . हि जर PRIVATE कंपनी असती तर लोकांना हीच नाव देखील आठवलं नसत एवढा संथ कारभार या कंपनीचा राहिलेला आहे .

ITR FILING करताय ! तुम्हाला पडलेत का हे 12 प्रश्न , जाणून घ्या उत्तर…
     येथे क्लिक करा 

 

 

5G सारख्या सुपर फास्ट तंत्रज्ञानापुढे BSNL चे 4G तंत्रज्ञान कितपण कार्य करील याची थोडी शंका वाटते . आतापर्यत संथ गतीने चाललेला BSNL चा कारभार कितपत वेग घेऊन काम करेल हे पाहण्यासारखे ठरेल .

TATA TCS सारख्या मोठ्या कंपनीची साथ त्यांना मिळाली असती तरी 5G तंत्रज्ञानाच सोंग त्यांना करता येणार नाही , आधी 4G सुविधा देण्या मधेच त्यांचा खूप जास्त वेळ जाईल.असे देखील वाटते .

प्रॅक्टिकल होऊन विचार केला तर आजच्या फास्ट फॉरवर्ड जगामध्ये आपली स्पीड कमी करणे कोणालाही पटणार नाही . आज लोकांना सर्व गोष्टी खूप लवकर हव्या असतात .

कोणाकडेही वाट बघण्यासाठी वेळ उरला नाहीये . कितीही बॉयकॉट चा ट्रेंड चालला तरी लोकांना फास्ट इंटरनेट साठी  5G तंत्रज्ञाना शिवाय पर्याय नाही हे देखील तितकेच खरे आहे . TATA TCS यामध्ये काय बदल घडवून आणेल हे देखील पाहण्यासारखे असणार आहे .

 

 

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment