work from home करायचं तर या 6 गोष्टींची काळजी घेऊनच करा..

work from home गूगल वर खूप जास्त सर्च केला जाणारा विषय आहे .तुम्ही पण तुमच्या फावल्या वेळेत हे नक्की सर्च केलेलं असणार . बऱ्याच जणांना work from home काम करायला आवडत ,ऑफिस ला जायचा ताण नसतो ,सकाळी लवकर उठाव लागत नाही .  आपापल्या पाहिजे त्या वेळेत काम करता येत . वेळेचं बंधन नसत कोणाचा धाक नसतो .

work from home चे अनेक असे फायदे आहेत . याच सुखकर जॉब साठी बरेच जण प्रयत्नात असतात . त्या साठी धडपड करतात .online अनेक site वर ती आपली माहिती नोंदवतात .आपला पर्सनल डेटा शेअर करतात .

google वर घरबसल्या काम अश्या नावाखाली अनेक पोस्ट तुम्हाला दिसतील .वेगवेगळी प्रलोभने दिली जातील .एवढा पगार तेवढा पगार असे सांगितले जाईल .काही अंशी ते खरे देखील असते .पण सर्वच चांगला job ऑफर करतात असे नाही . work from home च्या नावाखाली तुम्हाला चांगलाच चुना लावण्याचा त्यांचा हेतू असतो .

डोळ्यावर पगारांच्या आकड्यांची चादर असल्या कारणाने आपल्याला त्यातील गूढ काही काळात नाही . घर बसल्या पैसे कमवायचा नादात आपण घरबसल्या उद्योग करून पैसे गमावून बसतो हे आज खरे ठरत आहे , तुम्ही कोणत्या online work from home च्या scam मध्ये अडकलात का ?

माझ्या ऐकण्यात असे अनेक उदाहरणे आहेत , महिना महिना काम करून घेऊन , पगाराच्या दिवशी काहीतरी आधीचं सांगून त्रुटी दूर करण्यासाठी थोडे पैसे मागायचे , ते पैसे मिळाले कि लगेच आणखी काही पैसे मागायचे ,नाही दिल्यास पैसे पगार होणार नाही.

( जरा वेगळा विषय म्हणून तुम्हाला जर विष्णुपुराणातील समुद्रमंथनाची कथा वाचायची असेल तर या लिंक वर क्लिक करा .)

किव्वा पगार लॉक होईल असं सांगून आणखीनच अडचण निर्माण करायची  त्यांचा हेतू साध्य झाला की सोडून द्यायचं रिप्लाय द्यायचा नाही .हा सर्व खेळ scammers यांचा रोजचाच आपणच त्यात नवीन असतो . work from home च्या नादात आपण गुंतलो जातो व नंतर पश्याताप करण्याशिवाय काही उरात नाही .

आणि आपल्या चार दोन हजारासाठी कुठे complaint करता म्हणून आपण विषय मूग गिळून सोडून देतो व कानाला खडा लावतो व म्हणतो पुन्हा work from home च्या नाही लागणार नाही पण हे काही बरोबर नाही .पण या scammers चा हा व्यवसाय असल्या कारणाने त्यांना रोजचा बकरा सारखाच . त्यांना फक्त पैशाशी मतलब कोणाशी काही घेणं नाही .

cyber गुन्ह्यांचं हे एक प्रकारचं जाळच असत .

google वर च्या work from home देणाऱ्या site खऱ्या कि खोट्या कश्या ओळखायच्या ?

  • एक तर त्या https sites असाव्यात म्हणजे  आपला डेटा security मध्ये राहतो . जर site http असेल तर नादालाच लागू नका .
  • आता त्या site ची design पण व्यवस्तीत बगा fake site निरीक्षणाने पण ओळखू शकता  .
  • या site ची  माहिती third party sites वर किव्वा social मीडिया वर पडताळून पाहावी .
  • site वरचे visitors चे कंमेंट्स देखील वाचाव्यात याने तुम्हाला लोकांचे अनुभव या site विषयीचे काळातील .
  • ऑनलाईन जॉब च्या बऱ्याच websites ला तुम्ही भेट दिली असेल .काही sites सुरवातीलाच पैशाची मागणी करतात तर काही sites आधी तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात व तुम्हाला अमिश म्हणून थोडी रक्कम देऊ करतात व नंतर वसूल करतात .
आता पाहुयात त्या सहा गोष्टी ज्या तुम्हाला ऑनलाइन किंवा work from home साठी लक्षात ठेवायच्या आहेत .

१. कोणतीही site सुरवातीलाच तुमचे बँक डिटेल डायरेक्ट मागत नाही ,ती तुम्ही पूर्ण पडताळणी केल्या शिवाय देऊ नये .

२.कोणतीही नॅशनल किंवा मल्टि नॅशनल कंपनी किंवा फर्म तुम्हाला पैशाची मागणी करणार नाही ,असे होत असल्यास आपल्यासोबत फ्रॉड तर होत नाही ना याची खात्री नक्की करून घ्या .

३.पूर्ण पडताळणी शिवाय आपली पर्सनल डिटेल्स पण share करू नये .

४.एक site वरून दुसऱ्या ,दुसऱ्या वरून तिसऱ्या अश्या जर लिंक वर क्लिक करण्यास जर अश्या site मध्ये करण्यास सांगत असतील तर तो बहुतांशी फ्रॉड आहे असं समजावं .कारण असे फ्रॉड लिंक च्या माध्यमातून जास्त होत असतात .

कुठल्याही मोठ्या किंवा चांगल्या कंपनी चे कामकाज एकाच ठिकाणी चालते अश्या genuin कंपन्या वेगवेगळ्या लिंक share करत नाहीत .

५. work from home च्या नावाजलेल्या काही site आहेत त्यावर आपला अर्ज दाखल करून ठेवावा .तेथे तुम्हाला धोखा होण्याची शक्यता खूप कमी असेल .जितची वेबसाईट अनोळखी तितकाच धोका देखील असू शकतो .

६.आपल्या जवळचा एखादा मित्र किंवा नातेवाईक जर अश्या कंपनी मध्ये असेल तर त्यांच्या सल्ला घेऊनच पुढील पाऊल उचलावे .जेणेकरून आपल्याला योग्य असे मार्ग दर्शन मिळेल .

”कुठल्याही online व्यवहारामध्ये सावध राहा आणि नेहमी सतर्क राहा . ”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment